ETV Bharat / bharat

बिहारच्या विद्यार्थ्यांना घेऊन दोन विशेष रेल्वे कोटावरून रवाना होणार - Rajasthan News

राजस्थान आणि बिहार सरकार यांच्यात झालेल्या सहमतीनुसार विद्यार्थ्यांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोटा येथून बेगूसराय आणि गया येथे दोन ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

today-students-will-go-from-kota-to-bihar-by-train
बिहारच्या विद्यार्थ्यांना घेऊन दोन विशेष रेल्वे कोटावरून रवाना होणार
author img

By

Published : May 3, 2020, 11:28 AM IST

कोटा- राजस्थानातील कोटा येथे विविध अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी बिहारमधील विद्यार्थी राहत होते. या विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये परतण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली होती. त्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले होते. मात्र आता राजस्थान आणि बिहार सरकार यांच्यात झालेल्या सहमतीनुसार विद्यार्थ्यांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोटा येथून बेगूसराय आणि गया येथे दोन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बिहारच्या विद्यार्थ्यांना घेऊन दोन विशेष रेल्वे कोटावरून रवाना होणार

बिहारला जाणारी विद्यार्थ्यांची पहिली रेल्वे रविवारी सकाळी 11 वाजता सोडण्यात येईल, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी विजय प्रकाश यांनी दिली. ही रेल्वे सोमवारी 5.30 वाजता बेगूसरायला पोहोचणार आहे. बंका, बेगूसराय, भागलपुर, जमुई, खगरिया, लखीसराय, मुंगेर आणि शेखपुरा येथील विद्यार्थी या रेल्वेतून प्रवास करणार आहेत.

दुसरी रेल्वे रात्री 9 वाजता कोटा येथून गया येथे जाणार आहे. बयाना, टूंडला, कानपुर आणि दीनदयाल उपाध्याय नगर यामार्गे ही रेल्वे सोमवारी ही रेल्वे 12.30 वा. गया येथे पोहचणार आहे. अग्रवाल, औरंगाबाद, गया, जहानाबाद आणि नवादा येथील विद्यार्थी या रेल्वेतून प्रवास करणार आहेत.

कोटामधून 28 हजार विद्यार्थी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, आसाम, गुजरात, राजस्थान, दमन-दीव, दादर-नागर हवेली, जम्मू कश्मीर, लेह लद्दाख, पंजाब, छत्तीसगढ़, कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम-बंगाल राज्यामध्ये परतले आहेत. बिहार राज्यातील 8 हजार विद्यार्थ्यांना येत्या 4 दिवसात परत पाठवले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.