ETV Bharat / bharat

गोवा विधानसभेत आज शक्तिपरीक्षा; मुख्यमंत्री सावंतांचा बहुमताचा दावा

सोमवारी मध्यरात्री सावंत यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी (आज) भाजपला विधानसभेत बहुमत प्रदर्शनाला सामोरे जावे लागणार आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी बुधवारी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले आहे.

author img

By

Published : Mar 20, 2019, 12:31 PM IST

डॉ. प्रमोद सावंत

पणजी - मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री ठरले आहेत. सोमवारी मध्यरात्री सावंत यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी (आज) भाजपला विधानसभेत बहुमत प्रदर्शनाला सामोरे जावे लागणार आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी बुधवारी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बहुमताचा दावा केला आहे. आम्हीच जिंकू याचा आम्हाला १०० टक्के विश्वास आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे. विधानसभेत ११:३० वाजता हे शक्तिप्रदर्शन होणार आहे. गोव्यामध्ये भाजपचे संख्याबळ १२ आहे, तर गोवा फॉरवर्ड पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रत्येकी ३ आमदारांबरोबरच ३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपने दावा केला आहे.

Intro:Body:

dr-pramod-sawant-took-oth-in

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.