ओडिशात 'फनी'चा कहर; ११ लाख नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, विमानसेवा बंद
'फनी' चक्रीवादळाने आज सकाळीच ओडिशाच्या किनारपट्टीवर धडक दिली. त्यावेळी वाऱ्याची गती १७५ किमी प्रति तास होती. दरम्यान वादळग्रस्त परिसरात मुसळधार पावसानेही हजेरी लावली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मंदिरे पाण्याखाली गेली आहेत, तर आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागातही जोरदार वाऱ्याचा तडाखा बसला आहे. कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक किनारपट्टी भागात तैनात करण्यात आले होते.
सविस्तर बातमीसाठी इथं क्लिक करा....
राज ठाकरेंच्या सभांचा भार काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाही, भाजपची मागणी फोल
आपल्या झंजावाती प्रचाराने भाजपची डोकेदुखी वाढवणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस दिली आहे. मात्र, ठाकरे यांच्या सभांचा खर्च काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खर्चात समाविष्ट होणार नसल्याने भाजपची मागणी फोल ठरली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ठाकरे यांच्या सभांचा खर्च काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खर्चात समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी आयोगाला पत्र लिहून केली होती.
सविस्तर बातमीसाठी इथं क्लिक करा...
बुरखाबंदीचा वाद चिघळला, मुस्लिम महिलांची संजय राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी
श्रीलंकेमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटामुळे तेथील सरकारने मुस्लिम महिलांनी बुरखा वापरू नये, असे आदेश काढले. त्याचीच 'री' ओढत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारतात देखील बुरखाबंदी करावी, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाने संतप्त झालेल्या मुस्लिम महिलांनी आज मुंब्रा येथे जोरदार निदर्शने केली. तसेच संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सविस्तर बातमीसाठी इथं क्लिक करा...
बॉलिवूडच्या सुवर्ण काळाचा साक्षीदार आर. के. स्टुडिओच्या जागी होणार बहुमजली इमारत
बॉलिवूडच्या सुवर्ण काळाचा साक्षीदार असलेल्या आर. के. स्टुडिओचे मालकी हक्क आता गोदरेज कंपनीने घेतले आहेत. मुंबईतील चेंबूरमध्ये दिमाखात उभा असलेला आर. के. स्टुडिओ लवकरच पाडण्यात येणार आहे. आर. के. स्टूडिओचे मालकी हक्क आता गोदरजे कंपनीला देण्यात आले आहेत. हा स्टुडिओ विकत घेतल्याची अधिकृत घोषणादेखील कंपनीने केली आहे. हा स्टुडिओ पाडून येथे अलिशान फ्लॅट्स उभारले जाणार आहेत. त्यामुळे आर. के. स्टुडिओ हा इतिहासजमा होणार आहे.
सविस्तर बातमीसाठी इथं क्लिक करा...
क्रिकेटचा देव सचिन म्हणतो, भारतीय संघच जिंकेल विश्वकरंडक स्पर्धा
इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडकासाठी आता काहीच दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक क्रिकेट पंडितांनी विश्वकरंडकाचा किताब कोण पटकावणार, कोणता खेळाडू विश्वकरंड गाजवेल? याबाबत आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
सविस्तर बातमीसाठी इथं क्लिक करा...