ETV Bharat / bharat

औरंगाबादेत आज ३० रुग्णांची भर, कोरोनाबाधितांचा आकडा ८३ वर

author img

By

Published : Apr 27, 2020, 12:02 PM IST

Updated : Apr 27, 2020, 11:02 PM IST

देशभरासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 27 हजारांच्या पुढे गेला आहे तर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 8 हजारांच्या पुढे गेला आहे.

today corona updates  corona updates  country corona updates  कोरोना अपडेट्स भारत
महाराष्ट्रात आतापर्यंत ८ हजार ६८ जणांना कोरोनाची लागण, तर ३४२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. तरीही देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्यावर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात ही रुग्णसंख्या ८ हजार ५९० झाली आहे. तसेच देशभरात कोरोनामुळे ८०० जणांचा मृत्यू झाला आहे.

today corona updates  corona updates  country corona updates  कोरोना अपडेट्स भारत
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय रुग्णसंख्या
  • औरंगाबाद - कोरोनाचे 30 नवीन रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 83 वर
  • मुंबई - आज (सोमवारी) राज्यात 522 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 8590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • कर्नाटक - आज १३ रुग्ण कोरोनामुक्त
  • गुजरात - गेल्या २४ तासांत २४७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ५४८ वर पोहोचला आहे. यामध्ये ३९४ डिस्चार्ज, तर १६२ मृत्यू झालेल्यांचा समावेश आहे.
  • विद्यापीठांच्या परीक्षांबाबत आज विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. यामध्ये तज्ज्ञ समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. तसेच सदस्यांनी काही सूचना देखील केल्या. त्यावर सविस्तर चर्चा करून आयोगाद्वारे विद्यापीठांच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन सूचना लवकरच जारी करण्यात येतील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सांगण्यात आले.
  • यवतमाळ - दिवसभरात 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 69 वर पोहोचली आहे, तर आयसोलेशन वॉर्डात एकूण 305 जण आहेत.
  • मुंबई - वांद्रे परिसरातून 10 इंडोनेशियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडी मंगळवारी (२८ एप्रिल) संपणार आहे. यामध्ये 6 महिलांचा समावेश असून ते दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झाले होते.
  • मुंबई - धारावीमध्ये आणखी १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८८ वर पोहोचला आहे.
  • औरंगाबाद - शहरात आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १६ वर्षीय मुलगी, ५ वर्षीय मुलगा आणि ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ वर पोहोचली आहे.
  • सोलापूर - शहरात 4 डॉक्टर आणि एका नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे.
  • देशात १ हजार ४६३ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर ६० जणांचा मृत्यू झाला आहे.
  • देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार ३३० वर पोहोचली आहे. यामध्ये २१ हजार १३२ जणांवर उपचार सुरू आहे, ६३६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर ८८६ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • मुंबई - कोरोनाचा संसर्गामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातील शिवाजी सोनावणे (56) या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस खात्यातील मृतांचा आकडा 3 वर पोहोचला आहे.
  • मध्यप्रदेश - राजस्थानमधील कोटा येथून २८ विद्यार्थी बसने छत्तीसगडला जात असताना अपघात झाला. यामध्ये एक विद्यार्थिनी जखमी झाली असून सर्व सुखरूप आहेत.
  • रॅपिड टेस्टींग किटचा वापर तत्काळ थांबवावा - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालय पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -
  1. देशभरात आज १ हजार ३९६ जणांना कोरोनाची लागण
  2. पुण्यात कोरोनाचे रुग्ण ७ दिवसांत दुप्पट
  3. झोपडपट्टी परिसरात संस्थात्मक अलगीकरण गरजेचे - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
  4. देशातील १६ जिल्ह्यात २८ दिवसांत नवीन रुग्ण नाही. यामध्ये महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे.
  5. कोरोना रुग्णांशी भेदभाव करणे चुकीचे
  • भंडारा - येथे पहिला कोरोना रुग्ण आढळला. एका 45 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे जिल्ह्यधिकाऱ्यांनी सांगितले. गराडा आणि मेंढे या गावाला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले.
  • मुंबईमध्ये कोरोनाबाधितांवर प्लाझमा थेरपीला सुरुवात -
  1. लीलावती रुग्णालय - एका रुग्णावर उपचार
  2. सायन रुग्णालय - दोन रुग्णांवर उपचार
  3. सेव्हन हिल रुग्णालय - ३ रुग्णांवर उपचार

यासोबतच नायर रुग्णालयात देखील प्लाझ्मा फेरेसिस मशीन बसविले आहे.

  • परभणी - अकरा दिवसांपूर्वी सापडलेल्या एकमेव कोरोनाबाधित रुग्णामुळे ग्रीन झोनमधील परभणी जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला होता. मात्र, या रुग्णाचे पुन्हा पाठवण्यात आलेले दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्याला लवकरच जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. या दिलासादायक बातमीमुळे परभणी जिल्हा तुर्तास कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, असे असले परजिल्ह्यातून चोरट्या मार्गाने येणार्‍या लोकांचा लोंढा थांबलेला नाही. त्यामुळे परभणीकरांनी अजूनही काळजी घेण्याची गरज आहे.
  • पुणे - पुण्यात आणखी ५५ जणांना कोरोनाची लागण झाली, तर तिघांचा मृत्यू झाला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १३१९ वर पोहोचला आहे.
  • महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय रुग्णसंख्या -(२६ एप्रिल २०२० पर्यंतची आकडेवारी)
  • जळगाव - जिल्ह्यात कोरोनामुळे पाचवा बळी गेला आहे. अमळनेर शहरातील एका 66 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी रात्री उशिरा या वृद्धाचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
  • मुंबई - कोरोनामुक्त झालेल्या चार रुग्णांच्या रक्तांचे नमुन्यांची तपासणी केली असता ते सकारात्मक आढळून आले आहेत. आता त्यांच्या अँन्टीबॉडीजचा वापर कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी केला जाणार आहे.
  • नर्सची नोकरी सोडून किशोरी पेडणेकर यांनी राजकारणात प्रवेश केला होता. आता पुन्हा त्या नर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
  • आंध्रप्रदेशमध्ये गेल्या २४ तासांत ८० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार १७७ वर पोहोचला आहे.
  • हिंगोलीमध्ये राज्य राखीव दलाच्या आणखी चार जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. हे चारही जवान कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ११ झाली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला
  • महाराष्ट्रात आतापर्यंत ८ हजार ६८ जणांना कोरोनाची लागण, तर ३४२ जणांचा मृत्यू

Last Updated : Apr 27, 2020, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.