ETV Bharat / bharat

गोव्यात आज नवीन 11 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण सख्या 66 वर

author img

By

Published : May 24, 2020, 8:14 PM IST

गोव्यात आज (रविवार) नवीन 11 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे गोव्यातील एकूण रुग्णसंख्या ही 66 वर पोहोचली आहे.

Breaking News

पणजी - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा देशातही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. गोव्यात आज (रविवार) नवीन 11 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे गोव्यातील एकूण रुग्णसंख्या ही 66 वर पोहोचली आहे. तर आज तिघांना यशस्वी उपचारानंतर सोडण्यात आले आहे.

पॉझिटिव्ह सापडलेले 11 जण हे मुंबईतून प्रवास करत गोव्यात दाखल झाले होते. त्यांची स्वॅब तपासणी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील व्हायरलॉजी प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यांचे अहवाल सकारात्मक आल्यामुळे त्यांना मडगाव येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दिवसभरात 591 नमुने तपासणी करण्यात आले. ज्यामध्ये 580 नकारात्मक आले आहेत. एकूण 66 रुग्ण आढळून आले असले तरीही कोविड इस्पितळात 47 जणांना दाखल करण्यात आले आहे. विविध रेसिडेन्सी अथवा हॉटेलमध्ये आतापर्यंत 705 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत 19 जणांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.