कोलकाता (पश्चिम बंगाल) - तृणमूल काँग्रेस पक्षाचे आमदार तमोंश घोष यांचा आज (बुधवारी) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. तीन वेळा तृणमूल काँग्रेसकडून ते आमदार म्हणून निवडून आले. घोष यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक्त व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, घोष यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झालं. आम्ही त्यांच्या परिवारासोबत उभे असून, ते आमच्यासोबत 1998 पासून होते. त्यांच्या 35 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी लोकांमध्ये जावून काम केलं. त्यांन दिलेले पक्षासाठी योगदान न विसरण्यासारखे आहे. असे ट्वीट करून मुख्यमंत्र्यांनी त्यांन त्यांना आदरांजली अर्पण केली.