कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी वकिलामार्फत मोदी यांना नोटीस पाठवली आहे.
कोलकाता येथील डायमंड बाजार परिसरात १५ मे रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा झाली होती. या सभेत मोदी यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या संदर्भात अपमानजनक टीका केली होती, असा आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे.