ETV Bharat / bharat

गोव्यात आत्तापर्यंत १७७६ जणांची कोरोना चाचणी; ७ जण वगळता उर्वरित निगेटिव्ह - goa

काल दिवसभरात ८८ जणांचे नमुने घेण्यात आले. तर, १२३ जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. राज्यात २९ जानेवारीपासून आजपर्यंत १७७६ जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले आहे. यामधील सर्वच अहवाल प्राप्त झाले आहे. फॅसिलिटी विलगीकरणामध्ये ११ जणांना तर गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ४ जणांना भरती करण्यात आले आहे.

1776 corona tested goa
प्रतिकात्मक
author img

By

Published : Apr 29, 2020, 11:22 AM IST

पणजी- गोव्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संशयीत रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या सर्वांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये केवळ ७ जणांचे अहवाल वगळता उर्वरित १७६८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रुग्णांचे स्वॅब नमुने घेतले जातात. प्रयोगशाळेत त्यांची तपासणी करण्यासाठी वेळ लागत असल्याने कधीकधी अहवाल उशिरा मिळतो. या सर्व घडामोडी सुरू असतानाच गोव्यात काही दिवसांपूर्वी व्हायरोलॉजी प्रयोगशाळा सुरू करून येथेच संभाव्य रुग्णांची तपासणी करण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे अहवाल मोठ्यासंख्येने आणि कमीतकमी वेळात मिळण्यास सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर काल दिवसभरात ८८ जणांचे नमुने घेण्यात आले. तर, १२३ जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. राज्यात २९ जानेवारीपासून आजपर्यंत १७७६ जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले आहे. यामधील सर्वच अहवाल प्राप्त झाले आहे. फॅसिलिटी विलगीकरणामध्ये ११ जणांना, तर गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ४ जणांना भरती करण्यात आले आहे.

सद्या घरगुती विलगीकरणात असलेल्यांची संख्या १७९४ इतकी आहे. ही संख्या मागील काही दिवसांपासून स्थिर आहे, तर पॉझिटिव्ह रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. गोव्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसले तरीही सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. लॉकडाऊनची अमलबजावणी कडक होण्याकडे लक्ष दिले जात आहे, त्यामुळे सार्वजनिक उपक्रम अथवा धार्मिक विधी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकही नियमांचे पालन करताना दिसून येत आहे.

हेही वाचा- केरळ सरकारच्या वेतन कपात निर्णयाला न्यायालयाची स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.