नवी दिल्ली- टिक-टॉक हे अॅप भारताली डॉक्टरांना 100 कोटी रुपयांचे वैयक्तिक सुरक्षा संच दान करणार आहे. जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लढणाऱ्यां भारतातील डॉक्टरांसाठी हे देत असल्याचे टिक-टॉकने म्हटले आहे.
4 लाखांपैकी पहिले 20675 सुरक्षा संच आज भारतात आले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात 180375 सुरक्षा संच शनिवारपूर्वी भारतात पोहोचतील. उर्वरित 2 लाख संच पुढील आठवड्यात भारतात येतील असे,टिक-टॉकने जाहीर केले आहे.
टिक-टॉकचे भारतातील प्रमुख निखील गांधी यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुरक्षा संच भारतात आणण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत कोरोना विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडेल,असेही टिक-टॉकने म्हटले आहे.
भारतात टिक-टॉकचे 250 दशलक्ष वापरकर्ते आहेत. आमच्या अॅपद्वारे आम्ही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याबाबत जनजागृती करत असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्च पासून 21 लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.