श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील बाटमलू भागात गुरुवारी सकाळीपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
-
#SrinagarEncounterUpdate: 01 #unidentified #terrorist killed. Search going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/TmuQLtrIL2
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) September 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#SrinagarEncounterUpdate: 01 #unidentified #terrorist killed. Search going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/TmuQLtrIL2
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) September 17, 2020#SrinagarEncounterUpdate: 01 #unidentified #terrorist killed. Search going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/TmuQLtrIL2
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) September 17, 2020
सुरक्षा दलांना याठिकाणी दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आज पहाटे २.३० वाजेपासून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांमार्फत अजूनही शोधमोहीम सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
-
#UPDATE 2 more terrorists (total 3) neutralised in the ongoing encounter in Batamaloo area of Srinagar, J&K: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) September 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE 2 more terrorists (total 3) neutralised in the ongoing encounter in Batamaloo area of Srinagar, J&K: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) September 17, 2020#UPDATE 2 more terrorists (total 3) neutralised in the ongoing encounter in Batamaloo area of Srinagar, J&K: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) September 17, 2020
एका महिलेचा मृत्यू, दोन जवान जखमी..
या चकमकीदरम्यान गोळी लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कौंसर रियाझ असे या महिलेचे नाव आहे. तसेच, या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान गोळी लागून जखमी झाले आहेत. यांपैकी एक अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : बाबरी मशीद विध्वंस प्रकरण : सीबीआयचे विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला देणार निर्णय