बाराबंकी - लखनऊ-अयोध्या महामार्गावरून आपापल्या गावी निघालेल्या ७ मजूरांना एका ट्रकने धडक दिली. या धडकेत तीन जणांच्या जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मजूर उत्तर प्रदेशच्या बहराईच जिह्यातील रहिवाशी आहेत. ते गुजरातच्या सुरतमध्ये साडी कारखाण्यामध्ये काम करत होते. पण सद्या कोरोनामुळे काम बंद आहे. यामुळे त्यांनी आपापल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला.
कामगार कानपूरमार्गे बाराबंकी येथे आले होते. ते रस्त्यालगत वाहनाची वाट पाहत थांबले होते. तेव्हा अचानक एका ट्रकने त्यांना धडक दिली. यात मोहन, शिशुपाल आणि जितेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदनानंतर कामगारांचे मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्यात येणार आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर स्थलांतरितांकडून पोलिसांवर दगडफेक
हेही वाचा - गुजरातचे कायदामंत्री चुडासामा यांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा