पाटणा - बिहारच्या मुंगेर जिल्ह्यामध्ये घराला आग लागून तिघांचा मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीमध्ये एक आजी आणि तिच्या दोन नातींचा होरपळून मृत्यू झाला.
मुंगेरच्या तारापुरमधील कहुआ मुसहरी गावातील ही घटना आहे. या गावात राहणारे बानो मांझी यांच्या घराला अचानक आग लागली. यावेळी दुलिया देवी या त्यांच्या दोन नातींसह झोपल्या होत्या. आग लागल्यामुळे या तिघींचाही मृत्यू झाला.
दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात गावकऱ्यांना यश मिळाले, मात्र तोपर्यंत या तिघींचाही मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी मिळून घरातील बाकी सदस्यांना सुरक्षित बाहेर काढले.
मृतांच्या कुटुंबीयांना आपत्ती निधीमधून मदत देण्यात येईल, असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले.
हेही वाचा : 'चिनी विषाणू परत जा', लॉकडाऊनचे नियम धाब्याबर बसवून भाजप आमदाराची घोषणाबाजी