ETV Bharat / bharat

आग्र्यात फटाक्यांच्या गोदामात स्फोट; तीन ठार, अनेक जखमी

author img

By

Published : Oct 18, 2020, 8:22 PM IST

आग्र्यात फटाक्यांनी भरलेल्या गोदामात झालेल्या स्फोटात तिघे ठार तर अनेकजण जखमी झाले. या स्फोटानंतर शहागंजचा संपूर्ण परिसर धुराने व्यापला. स्फोट इतका जोरदार होता की, दोन किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांचा व्यवसाय सुरू झाला आहे. या गोदामात गेल्या अनेक दिवसांपासून फटाक्यांचा अवैध साठा असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

आग्र्यात फटाक्यांच्या गोदामात स्फोट
आग्र्यात फटाक्यांच्या गोदामात स्फोट

आग्रा - आग्र्यात फटाक्यांनी भरलेल्या गोदामात स्फोट होऊन तीन लोक ठार तर, अनेकजण जखमी झाले. या स्फोटानंतर शहागंजचा संपूर्ण परिसर धुराने व्यापला होता. स्फोट इतका जोरदार होता की, दोन किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला.

आग विझविण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी अग्निशमन दलाच्या जवानांसह स्फोटाच्या स्थळावर दाखल झाले. बचावकार्य सुरू झाल्यानंतर येथील जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. येथील ढिगारा साफ झाल्यानंतर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - काश्मीर : हा आहे श्रीनगरचा लाल चौक आणि घंटाघर

सनफ्लावर शाळेजवळील न्यू आझम पाडा गोडाऊनमध्ये हा स्फोट झाल्याचे शाहगंज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवाळी तोंडावर आली असताना शहरातील अनेक गोदामांमध्ये फटाक्यांचा व्यवसाय सुरू झाला आहे. या गोदामात गेल्या अनेक दिवसांपासून फटाक्यांचा अवैध साठा असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. स्थानिक व्यावसायिक चमन मन्सुरी यांच्या मालकीचे हे गोदाम असल्याचे समजले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.