लखनौ - महाविकास आघाडीच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला भेट देणार आहेत. शनिवारी ते अयोध्येमध्ये असतील. मात्र, त्याआधीच हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे आयोध्येत स्वागत करण्यासाठी, विशेष रेल्वेने हे शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.
यासोबतच, शिवसेनेचे नेतेदेखील मुख्यमंत्र्यांच्या एक दिवस अगोदरच अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना नेते, आणि खासदार संजय राऊत यांनी आज अयोध्येमधील तयारीची पाहणी केली. राऊत यांनी सांगितले, की शनिवार दि. ७ मार्चला दुपारी दोनच्या सुमारास उद्धव ठाकरे लखनौला पोहोचतील. त्यानंतर दुसऱ्या पालीमध्ये सायंकाळी ४.३०च्या सुमारास ते रामललाचे दर्शन घेतील.
यासोबतच राऊत यांनी सांगितले, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी सरयू आरती रद्द केली आहे. तसेच त्यांनी सर्व पक्षांना रामललाच्या मंदिर उभारणीसाठी एकत्र येण्याचे आवाहनही केले.
हेही वाचा : COVID-19 : गुरुग्राममध्ये आढळला आणखी एक रूग्ण..