ETV Bharat / bharat

पर्यटन व्हिसावर धार्मिक कार्यक्रमाला आलेल्या परदेशी नागरिकांना होणार तुरुंगवास ?

न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात येणार असल्याचेही राव यांनी सांगितेल. 28 परदेशी नागरिकांविरोधात राज्य सरकारने गुन्हाही दाखल केला आहे.

file pic
तबलिगी संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 11, 2020, 11:11 PM IST

रांची - पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आलेले असताना धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या 28 परदेशी नागरिकांविरोधात झारखंड सरकार कडक कारवाई करणार आहे. क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे झारखंड राज्याचे पोलीस महासंचालक एम. व्ही राव यांनी सांगितले आहे.

  • Case registered against 28 foreigners who had come here on a tourist visa, for taking part in religious activities. These people are under quarantine right now. After their quarantine period finishes, they will be produced before the court & sent to jail: Jharkhand DGP MV Rao pic.twitter.com/dJ3F94NngW

    — ANI (@ANI) April 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात येणार असल्याचेही राव यांनी सांगितेल. 28 परदेशी नागरिकांविरोधात राज्य सरकारने गुन्हाही दाखल केला आहे. पर्यटन व्हिसावर भारतात येऊन धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणे हे नियमांचे उल्लंघन असून अशा व्यक्तींची नावे काळ्या यादीत टाकण्यात येतील, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे.

तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रम

राजधानी दिल्लीत मार्च महिन्यात मरकज निजामुद्दीन येथे तबलिगी जमात या संघटनेने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्यने परदेशी नागरिक उपस्थित होते. त्यातील अनेक जण पर्यटन व्हिसावस आले असता धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले. यातील अनेकांना कोरोना असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या कार्यक्रमामुळे भारताता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले. भारतातील विविध राज्यातही हे परदेशी नागरिक गेले होते. त्यामुळे तेथे कोरोनाचे रुग्ण वाढले. अशा व्यक्तींवर आता कारवाई करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.