ETV Bharat / bharat

दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट; मुख्यमंत्री केजरीवालांची कबुली - दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल बातमी

आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. शक्य ती सर्व पावले आम्ही उचलू. रुग्णालयात आवश्यक खाटा असून काहीच कमतरता नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री केजरीवाल
मुख्यमंत्री केजरीवाल
author img

By

Published : Nov 4, 2020, 5:55 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील सध्याचे कोरोना रुग्ण पाहता ही कोरोनाची तिसरी लाट आहे असे म्हणता येईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान रुग्णसंख्या कमी झाली होती. आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. शक्य ती सर्व पावले आम्ही उचलू. रुग्णालयात आवश्यक खाटा असून काहीच कमतरता नाही, असेही ते म्हणाले.

सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बेडची रिक्त संख्या जास्ती आहे. दिल्लीतील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर असलेल्या LNJP रुग्णालयात 2 हजार बेडपैकी 1 हजार 545 बेड रिक्त आहेत. तर, दुसरीकडे GTB रुग्णालयामध्ये 1 हजार 500 बेडपैकी 1 हजार 321 बेड सध्या रिक्त आहेत.

कोरोनाची भीती -

नागरिक घराबाहेर पडत नाहीत. फक्त ५० टक्के गर्दी बाजारात पाहायला मिळतेय. फक्त सुट्टीच्या दिवशी गर्दी होते. नागरिक कोरोला अजूनही घाबरत असून त्यामुळे घराबाहेर पडत नाहीत, असे सचिन कुमार या दुकानदाराने सांगितले. काही ग्राहक बाजारात फक्त फेरफटका मारण्यास येत असून खरेदी करण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या एका दुकानदाराने म्हटले, कोरोनामुळे अनेकांचे नोकऱ्या जात आहेत. आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे कपडे आणि बुटांच्या मागणी कमी झाली आहे. त्याचा बाजारावर परिणाम झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.