नवी दिल्ली - राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेच्या तयारीत आहे. मात्र, या तीन पक्षांनी जर सत्ता स्थापन केली तर हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
हेही वाचा - किशोरी पेडणेकर; नर्स ते मुंबईच्या महापौरपदापर्यंतचा प्रवास
काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन्ही पक्षांची विचारसरणी वेगळी-वेगळी आहे. शिवसेना ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार करते, काँग्रेस त्याचा विरोध करते. राष्ट्रवादी काँग्रेसचेही विचार शिवसेने सोबत जुळत नाहीत. संधीसाधूपणाच्या उद्देशाने एकत्र आलेले हे पक्ष आहेत. वैचारिक मतभेद असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यास महाराष्ट्रात कधीही स्थिर सरकार राहणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला याचा तोटा सहन करावा लागेल, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.