बंगळुरु - कर्नाटकातील राजकारण चांगलेच तापले आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यार आणखी विधानसभेचे अध्यक्ष के. रमेश कुमार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. बंडखोर आठ आमदारांचे राजीनामे हे योग्य स्वरुपात नसल्याचे विधानसभा सभापती के. आर . रमेश कुमार यांनी सांगितले आहे. काँग्रेसच्या आमदारांना भेटल्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
'मी राजीनामे स्वीकारण्यास मुद्दाम उशीर करत असल्याचे मला माध्यमातील बातम्यामधून माहित झाले आहे. हे एकून मला खुप वाईट वाटले. मी राजीनामे स्वीकारण्यास उशीर करत आहे. कारण, माझे राज्य आणि सविंधानाप्रती प्रेम आहे', असे रमेश कुमार हे पत्रकारांना बोलताना म्हणाले.
6 जुलैला मी 1.30 पर्यंत कार्यालयात होतो. आमदार माझ्याकडे 2 वाजता आले. त्यांनी भेटण्याची वेळ सुद्धा नव्हती घेतली. त्यांनी माझ्याशी संवाद साधला नाही. ते सरळ राज्यपालांकडे गेले. त्यानंतर मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो. यानंतर ते सर्वोच्च न्यायालयमध्ये गेले. माझ्याकडे यासंबधीत कार्यवाहीचा व्हिडिओ आहे. मी तो सर्वोच्च न्यायालयात जमा करणार आहे, अशी माहिती रमेश कुमार यांनी दिली.