ETV Bharat / bharat

आंदोलनजीवी म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांना मारला टोला - agri law

देशात अलीकडे आंदोलनजीवी ही नवी जमात उदयास आली आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. जिथे आंदोलन असेल तिथे हे लोक जातात.

आंदोलनजीवी म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांना मारला टोला

author img

By

Published : Feb 8, 2021, 12:47 PM IST

Updated : Feb 8, 2021, 2:06 PM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना आंदोलनांच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोला मारला. देशात आंदोलनजीवी ही नवी जमात अलिकडे वाढल्याचे मोदी म्हणाले.

आंदोलनजीवी ही नवी जमात

देशात अलीकडे आंदोलनजीवी ही नवी जमात उदयास आली आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. जिथे आंदोलन असेल तिथे हे लोक जातात. हे आंदोलनजीवी मुळात परजीवी असतात. अशा लोकांपासून देशाने सावध राहिले पाहिजेत. इथल्या सर्व लोकांना अशा आंदोलनजीवींचा अनुभव येत असेल असे मोदी म्हणाले.

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यावरून विरोधक निशाण्यावर

शेतकरी आंदोलनाला विरोधी पक्षातील नेते पाठिंबा दर्शवित आहेत. अनेक विरोधी नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन शेतकरी नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच धागा पकडून मोदींनी विरोधकांवर आपल्या भाषणातून निशाणा साधला आहे.

Last Updated : Feb 8, 2021, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.