डेहराडून - बद्रीनाथ धामाचे दरवाजे आज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर ०४:३० ला उघडण्यात आले. यावेळी पुजाऱ्यांसह फक्त 28 जणांनी बद्रीनाथ मंदिरातील अंखड ज्योतीचे दर्शन केले.
मंदिराचे दरवाजे उघडण्यावेळी मुख्य पुजारी आणि इतर पुजा स्थळांशी संबधीत 28 लोकांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली होती. यावेळी सर्वांनी सोशल डिस्टंन्स पाळला.
12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामामुळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येतात. आद्य शंकराचार्य यांनी 9व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.
बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून 3,133 मी (10,279 फूट) उंचीवर उत्तराखंडच्या चामोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ काही महिने दर्शनासाठी खुले असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रार्थना विनंती बद्रीनाथ मंदिराच्या पुजार्यांकडे पाठविली. बद्रीनाथ मंदिराचे पुजारी भुवन चंद्र उनियाल म्हणाले, की आज पुन्हा मंदीर उघडल्यानंतर बद्रीनाथ मंदिरात आम्हाला मिळालेली ही पहिली प्रार्थना विनंती आहे."
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत आणि पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी मंदिर सुरू झाल्याबद्दल भाविकांचे अभिनंदन केले. कोरोना विषाणुचा संसर्ग लवकर आटोक्यात येईल आणि चारधाम यात्रा लवकरात लवकर सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी, जोशीमठाचे उपविभागीय दंडाधिकारी अनिल चन्याल म्हणाले की, "भाविकांना मंदिरात प्रवेश घेता येणार नाही. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात, त्याशिवाय 5 मे हा दिवस 'गाडू घाडा' परंपरेसाठी निवडण्यात आले होते. सहा महिन्यांच्या हिवाळी विश्रांतीनंतर बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले गेले.