नवी दिल्ली - ऑनलाईन गेमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या 'पेटीएम फर्स्ट गेम्स'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका माहितीनुसार मागील एका महिन्यापासून वापरकर्त्यांच्या संख्येत प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनच्या प्रभावामुळे या गेमिंग कंपनीच्या वापरकर्त्यांच्या संख्येत तब्बल २०० टक्क्यांनी वाढ झाली.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दररोज पाच लाखांपेक्षा जास्त गेमर्स आपल्या दिवसातील ३० ते ४५ मिनिटांचा वेळ गेमिंग साईटवर घालवत आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे सर्व मॉल्स, चित्रपटगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाण बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे घरी बसून कंटाळलेले लोक ऑनलाईन मनोरंजनाच्या साधनांना पसंती देत आहेत. यामध्ये गेम खेळणाऱया लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑनलाईन गेम खेळणाऱयांमध्ये १८ ते ४५ या वयोगटातील लोकसंख्येचा प्रामुख्याने समावेश दिसत आहे, अशी माहिती 'पेटीएम फर्स्ट गेम्सच्या सुधांशू गुप्ता यांनी दिली.
हेही वाचा - COVID-19 : गेल्या चोवीस तासांमध्ये जगभरात पाऊण लाख नवे रुग्ण; तर पाच हजार जणांचा मृत्यू
पेटीएम फर्स्ट गेम्सने आत्तापर्यंत शेकडो विविध गेम ग्राहकांसाठी आणल्या आहेत. यामध्ये रमी, लुडो, तीन पत्ती, फँटसी क्रिकेट आणि इतर काही गेमचा समावेश होतो. या सर्व गेम्समध्ये प्रामुख्याने रमी खेळणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. लवकरच पेटीएम फर्स्ट गेम्स 'घरबैठे लखपती बनो' ही नवीन योजना ग्राहकांसाठी आणणार आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.