नवी दिल्ली -भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 7 हजार 964 नवे रुग्ण आढळले असून 265 जणांच मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 73 हजार 763 झाला आहे, यात 86 हजार 422 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 82 हजार 369 कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. तर 4 हजार 971 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत आहे. 31 मे ला पंतप्रधान मोदी मन की बात द्वारे देशाला संबोधीत करणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी 'मन की बात' या कार्यक्रमात लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही बाबी स्पष्ट करू शकतात. दरम्यान मृतांच्या आकडेवारीत भारताने आता चीनला मागे टाकले असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.