महोबा - महोबा जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर ईव्हीएम मशिन गायब झाल्यानंतर गोंधळ उडाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गडबडीत मशिन शोधण्यासाठी धावधाव केली. यावेळी मशिन शोधून देणाऱ्यास दहा हजार रुपये बक्षिसाची घोषणाही करण्यात आली. सध्या पोलिसांच्यावतीने मशिन शोधून ताब्यात घेण्यात घेण्यात आले.
महोबा हमीरपूर लोकसभा मतदारसंघासाठी महोबा जिल्ह्यातील मतदानानंतर पोलिंग पार्टीच्या पनवाडी ब्लॉकच्या नैगाव फदना गावातील पोलिंग पार्टीच्या बुथ नंबर १२७ ईव्हीएम मशिन गायब झाल्यानंतर जिल्हा प्रशासनामध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर लगेचच फदना गावात जाऊन तपासणी करण्यात केली पण काही मिळाले नाही. त्यानंर जिल्हा प्रशासनाकडून लाऊड स्पीकरवरून ईव्हीएम मशिन गायब झाले असून, शोधून देणाऱ्यास १० हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. शोध मोहीमेप्रसंगी बुथजवळ एक अनोळखी मशिन पडलेली दिसली. तीच गायब झालेली मशिन होती. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर ती मशिन मुख्यालयातील स्टॉक रूममध्ये आणण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या मशिनची तपासणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणाले, पोलिंग पार्टीच्या बेजबाबदारपणामुळे बुथ नंबर १२७ च्या ईव्हीएम मशिन गायब झाली होती. ज्या शाळेजवळील बुथवरील मशिन हस्तगत करण्यात त्या ठिकाणावरील बेजबाबदार असणाऱ्या सर्व टीमवर कारवाई करण्यात येणार आहे.