ETV Bharat / bharat

लातूरची पुनरावृत्ती : भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या चेन्नईला पहिल्यांदाच रेल्वेने पाणीपुरवठा

रेल्वे क्रमांक डब्ल्यूएजी ५ एचए २३९०७ ही ५० वॅगनमध्ये पाणी घेऊन सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी चेन्नईकड्डे रवाना झाली. चेन्नईला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

चेन्नईला पहिल्यांदाच रेल्वेने पाणीपुरवठा
author img

By

Published : Jul 12, 2019, 1:03 PM IST

चेन्नई - शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व स्त्रोत आटले आहेत. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी वेल्लोर येथून चेन्नईला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय तामिळनाडू राज्य सरकारने घेतला होता.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवर आवश्यक त्या तयारी पूर्ण करण्यास सांगितले होते. सर्व तयारी केल्यानंतर जोलारपेट येथून चेन्नईला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वेने पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी मागील २ आठवड्यापासून अधिकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली होती.

आज (शुक्रवार) जोलारपेट्टाई रेल्वे स्थानकावरुन चेन्नईकडे पहिली पाणी पुरवठा करणारी रेल्वे रवाना झाली आहे. रेल्वे क्रमांक डब्ल्यूएजी ५ एचए २३९०७ ही ५० वॅगनमध्ये पाणी घेऊन सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी चेन्नईकड्डे रवाना झाली. रेल्वे सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी चेन्नईजवळील विल्लीवक्कम येथे पोहोचली आहे.

तामिळनाडूत समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे काही ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही मागील काही वर्षापूर्वी भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना लातूर शहराला सांगली-मिरज येथून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.