हैदराबाद- पाकिस्तानचा कारगिलवर कब्जा करण्याचा इरादा होता. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केल्याची माहिती एका मेंढपाळाने भारतीय सैन्याला दिली होती. पाकिस्तानने सुरुवातीला घसखोरी करत भारताची विविध ठिकाणे ताब्यात घेतली होती. भारतीय सैन्याने विशेष रणनिती आखत ती सर्व ठिकाणे परत मिळवली. यामुळे कारगिल युद्धात भारताची सरशी झाली आणि पाकिस्तानची पिछेहाट झाली
द्रास सेक्टर मधील टोलोलिंग पॉईंट
द्रास क्षेत्रातील टोलोलिंग पॉईंटवर पाकिस्तातने कब्जा केला होता. द्रास पासून टोलोलिंग 5 किलोमीटर अंतरावर आहे. श्रीनगर-कारगिल-लेह महामार्गावरील ते महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी पाकिस्तानी सैन्य मोठ्या प्रमाणावर होते.
तीन आठवडे पाकिस्तानी लष्करासोबत लढाई केल्यानंतर टोलोलिंग ताब्यात मिळवणे निर्णायक टप्प्यात आणि दृष्टीक्षेपात आले होते. सुरुवातीला येथे नागा बटालियन,गढ़वाल आणि ग्रेनेडियर बटालियनचे प्रयत्न अयशस्वी ठरले. यानंतर एक नवी बटालियन आणि, 2 राज राइफल्स तैनात केल्या आणि अतरिक्त तोफादेखील समाविष्ट करण्यात आल्या.
मेजर विवेक गुप्ता यांच्या नेतृत्वात राजपुताना रायफल्सच्या सी कंपनी आणि मोहित सक्सेना यांच्या नेतृत्वात डी कंपनीने 12 जून रोजी गोळीबार सुरु केला. याशिवाय इतर दोन कंपन्या हमला करण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. याशिवाय एक कंपनी राखीव ठेवण्यात आली होती. डी कंपनी 4590 प्वाईंट वर गेली. तिथे त्यांचा समाना क्लोज रेंजशी झाला. कंपनीने तिथे त्यांचे स्थान निर्माण केले होते.
दरम्यान, समोरासमोरची लढाई सुरु झाली आणि टोलोलिंग टॉप चा रस्ता बंद झाला. यामुळे विवेक गुप्ता यांनी राखीव तुकडीचे नेतृत्व केले. गुप्ता लढाईत गंभीर जखमी झाले मात्र टोलोलिंग पॉईंटवरील शेवटचा पाकिस्तानी सैनिकाला मारे पर्यंत त्यांनी कंपनीचे नेतृत्व केले. यानंतर कॅप्टन मृदुलकुमार सिंह यांनी कंपनीचे नेतृत्व केले. सैनिकांचे मनोबल वाढवले आणि हल्ला केला. यानंतर भारतीय सैन्याने टोलोलिंग वर कब्जा केला. पाकिस्तानी सैन्यासाठी हा मोठा झटका होता.
2 राजपुताना राइफल्स चे कमांडिंग ऑफिसर, लेफ्टनंट कर्नल एम. बी. रविन्द्रनाथ यांनी मेजर पी. आचार्य यांच्या नेतृत्वात पॉईंट 4590 मधील इतर ठिकाणे मिळवण्यासाठी एका कंपनीचे नेृतत्व केले. 13 जूनला 2 राजपुताना रायफल्स अंतिमतः टोलोलिंगवर ताबा मिळवण्यात यशस्वी झाली.
या कठिण आणि निर्णायक लढाईत, सुभेदार भंवर लाल, कंपनी हवलदार मेजर यशवीर सिंग, हवलदार सुल्तान सिंह, नरवरिया आणि नाइक, दिगेंद्र सिंह शौर्य गाजवले. याशिवाय
कॅप्टन ए.न केंगुरूस आणि त्यांच्या कंपनीचेही महत्वाचे योगदान होते. त्यांनी त्याच्या कमांडो साथीदारांसह हंप आणि टोलोलिंग मधील संपर्क तोडला. यामुळे टोलोलिंगमधील पाकिस्तानी सैनिंकाना मदत मिळणे कठिण झाले.
टायगर हिल
टायगर हिल इतर पर्वतीय ठिकाणांपेक्षा कमी उंचीवर आहे. श्रीनगर-कारगिल-लेह महामार्गाच्या उत्तरेस 10 किलोमीटर आहे. मात्र, महामार्गाच्या काही ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्य मजबूत स्थितीत होते. टोलोलिंग दुश्मनांच्या ताब्यातून परत घेणे प्राथमिकता होती.
द्रास सेक्टर मधील टायगर हिल वर पुन्हा कब्जा मिळवणे हे कारगिल युद्धातील अंतिम विजयाचे प्रतीक मानले जाते. श्रीनगर-लेह राजमार्गावरील दुश्मन सैन्याला गोळीबार करावा लागला होता. टायगर हिल वर ताबा मिळवण्यासाठी 192 माउंटन ब्रिगेडच्या ब्रिगेडियर एम.पी.एस. बाजवा यांनी तोफखान्याच्या साथीने 18 ग्रेनेडियर्स, 8 शीख और 2 नागा यांनी कामगिरी बजावली. 3 जुलैच्या दिवशी 120 बंदुका, 122-मिमी अल्टि बैरेल्ड ग्रेड रॉकेट लांचर आणि मोर्टारच्या साथीने टायगर हिल वर हल्ला केला.
भारतीय वायु सेनेने 2-3 जुलैच्या दिवशी टायगर हिलवर हल्ला केला. टायगर हिल वर दोन मह्त्वाची ठिकाणे आहेत. एकाचे नाव इंडिया गेट आणि दुसऱ्याचे हेल्मेट असे आहे. दरम्यान पाकिस्ताची 12 नॉर्दर्न लाइट इन्फंट्रीची एक कंपनी तिथे तैनात होती. 3 जुलैच्या दिवशी18 ग्रेनेडियर्सने वातावरण आणि अंधाराचा फायदा घेत विविध दिशांवरुन हल्ला केला.याची सुरुवात तोफखाना आणि मोर्टारच्या वापराने झाली. एका कंपनी ने 4 जुलै च्या दिवशी मध्यरात्री 01 : 30 वाजेपर्यंत टंग नावाच्या ठिकाणावरील मध्यवर्ती क्षेत्र ताब्यात घेतले.
कॅप्टन निंबाळकर यांनी डी कंपनीचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्य आश्चर्यचकित झाले होते. थोडा वेळ गोळीबार केल्यानंतर डी कंपनी तेथील पूर्व प्रदेश ताब्यात घेण्यात यशस्वी झाली. यामुळे टायगर हिल च्या 100 मीटर अंतरावर भारतीय सैन्य पोहोचले.
लेफ्टनंट बलवान सिंह यांच्या नेतृत्वात सी कंपनी आणि त्यांचे कमांडो साथीदार यांनीही दुश्मन सैन्याला हैराण केले होते. यानंतर अवघड अशा पूर्वोत्तर आणि टायगर हिलच्या जवळील 30 मीटर अंतरावर असणारे एक ठिकाण भारतीय सैन्याने ताब्यात घेतले. 4 जुलैच्या दिवशी 4 वाजेपर्यंत गोळीबार, बॉम्बहल्ला करत सचिन निंबाळकर आणि बलवान सिंह हे त्यांच्या साथीदारांसह टाइगर हिल टॉप जवळ पोहोचले आणि दुश्मन सैन्याला चारी बाजूने घेरले. इथ आरपारची लढाई झाली आणि भारतीय सैन्य यशस्वी झाले. 18 ग्रेनेडियर्सह तिथे पोहोचली होती.
पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. 8 माऊंटन डिव्हिजनच्या लक्षात आले की पश्चिम स्पर येथून होणारी पाकिस्तानी सैन्याची मदत बंद होत नाही तोपर्यंत टायगर हिल येथून त्यांना हटवणे शक्य नाही. मोहिंदर पुरी आणि एमपीएस बाजवा यांनी 8 शीख सैनिकांना हेल्मेट और इंडिया गेट वर हल्ला करत ते ताब्यात घेण्यास सांगितले. यानंतर भारतीय सैनिकांनी इंडिया गेट वर ताबा मिळवला.8 शीख सैनिकांनी हेलमेट ठिकाणावर 5 जुलै ला ताबा मिळवला. भारतीय सैनिकांनी 8 जुलै रोजी संपूर्णपणे टायगर हिल वर कब्जा मिळवला आणि 18 ग्रेनेडियर्स ने टायगर हिल वर भारतीय तिरंगा फडकावला.
तीन क्षेत्रीय आयाम
तीन क्षेत्रीय आयाम क्षेत्र टोलोलिंग नालाच्या पश्चिमेकडे मारपोला राइडलाइन वर प्वाइंट 5100 च्या जवळ आहे. राष्ट्रीय महामार्ग, द्रास गांव आणि सैंडो नाला येथील प्रभावी क्षेत्र आहे.
हल्ल्यापूर्वी दोन तास ट्वेंटी आर्टिलरी फायर यूनिटने (सुमारे १२० बंदुका, मोर्टार्स आणि रॉकेट लाँचर्स) उच्च क्षमतेच्या स्फोटकांनी बॉम्बफेक सुरु केली. डी कंपनीने मोहित सक्सेना आणि मेजर पी. आचार्य यांच्या नेतृत्वाखालील एका कंपनीवर हल्ला केला. काही प्रमाणात जीवितहानी होऊनही भारतीय लष्काराने तेथे जम बसवला.
कंपनी कमांडर मेजर आचार्य आणि कॅप्टन विजयंत थापर यांनी हल्ल्याचे नेतृत्व केले. दोघेही यावेळी जखमी झाले मात्र, त्यांच्या कंपणीला ते पुढे घेऊन केले. भारतीय सैन्याला यामध्ये यश आले पण दोन्ही अधिकाऱ्यांना वीरमरण आले. भारतीय सैन्याने दोन्ही अधिकारी गमावल्याने अ कंपनीने पुढे येत त्याठिकाणी लढाईला सुरुवात केली आणि दुश्मन सैन्यावर हल्ला करण्यासा सुरुवात केली. यावेळी अ कंपनीच्या साथीला बी कंपनी देखील आली. दोन्ही कंपन्यांच्या हल्ल्यामुळे शत्रूची पिछेहाट झाली. लोण टेकडी शत्रू सैन्याच्या ताब्यात होती. तिथ त्यांचा चांगला बंदोबस्त होता. रात्र झाली तरी दोन्ही सैन्यामध्ये चकमक सुरु होती.
मोहित सक्सेना यांनी त्यांच्या कंपनीचे नेतृत्व करत दक्षिणेकडून हल्ला सुरु केला. यासाठी त्यांना 200 फुट ऊंचीच्या एका मोठ्या टेकडीवर जावे लागले. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे लोन टेकडी वर भारतीय सैन्याने कब्जा केला. त्यांच्या साथीला रायफलमन जय राम आणि कॅप्टन एन.केंगुरूस होते. 29 जूनच्या दिवशी तीन आयाम क्षेत्र भारतीयांच्या ताब्यात आले.
5140 पॉईंट
5140 पॉईंटचा क्षेत्र परत मिळवण्यासाठी भारतीय सैन्य दलाने सर्व बाजूंनी संपूर्ण ताकदीने हल्ला करायचे ठरवले. पूर्वेकडून 18 गढ़वाल रायफल्स, दक्षिणपश्चिमकडून 1 नागा आणि दक्षिणेतून 13 जाक रायफल्सने हल्ला केला. 19 जूनच्या दिवशीबी आणि डी कंपनीच्या 13 जाक रायफल्स ने दक्षिण तटावर चढाई केली आणि ते 5140 प्वाईंटवर पोहोचले. या लढाईत कॅप्टन विक्रम बत्रा यांनी पराक्रम केला, त्यांनी 4 पाकिस्तानी सैनिकांना मारुन टाकले. त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे कमांडिंग ऑफिसर यांनी ये दिल मांगे मोर अशा घोषणा दिल्या. कॅप्टन एस.एस. जम्वाल यांनी प्वाइंट 5140 वर निर्णायक लढ्याचे नेतृत्व केले. 20 जूनच्या भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैनिकांना तेथून हटवले.
मश्कोह खोरे
मश्कोह खोऱ्यातील सर्व टेकड्या पाकिस्तानने ताब्यात घेतल्या होत्या. त्यातील 4875 हा पॉईंट महत्वाचा होता.
4875 पॉईंट चे महत्व
मश्कोह खोऱ्यातील सर्व टेकड्या पाकिस्तानच्या ताब्यात होत्या. 4875 पॉईंट हे महत्वाचे ठिकाण होते. मोगलपुरा ते द्रास ला जोडणाऱ्या मार्गावर 4875 पॉईंट आहे. पाकिस्तानी तोफखान्याला येथून मतायिन ते द्रास पर्यंत जाणे सोपे होते.
13 जाक रायफल्स यांच्याकडे 4875 परत घेण्याची जबाबदारी होती. सी कंपनीने मेजर गुरुप्रीत सिंह यांनी पश्चिमेकडून आक्रमण केले. कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या तुकडीनेही पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण केले. 4875 पॉईंट ताब्यात घेण्यासाठी तुकड्या जवळ पोहोचताच पाकिस्तनी सैन्याने प्रत्युत्तर दिले यामुळे यावेळी भारतीय सैन्याला फारशी प्रगती करता आली नाही.
5 जुलै रोजी भारतीय सैन्यातील अ कंपनी आणि सी कंपनीने पुन्हा हल्ला केला. कॅप्टन बी.एस.रावत आणि कॅप्टन गणेश भट्ट यांनी तोफखान्याद्वारे हल्ला सुरुच ठेवला. मिसाईलचा देखील वापर शत्रू सैन्याचे तळ उद्धवस्थ करण्यासाठी वापरण्यात आले. 5 जुलैच्या दुपारी भारतीय सैनिकांनी 4875 पॉईंटच्या वर पोहोचले. रायफलमन संजय कुमार आणि श्याम सिंग यांनी पराक्रम गाजवला. 4875 च्याउत्तरेकडे पाकिस्तानी सैन्य होते तो भाग ताब्यात घेण्याचे ठरले. कॅप्टन विक्रम बात्रा यांनी त्याचे नेतृत्व केले. यामध्ये त्यांना वीरमरण आले. त्यानंतर भारताने हा भाग मिळवला. यात पाकिस्तानी सैनिकांची मोठी हानी झाली. भारताने 13 जाक रायफल, 2 नागा रायफल, 17 जाट रायफल तैनात ठेवल्या
झुलु
झुलु ताब्यात घेण्यासाठी ब्रिगेडीअर एम.पी.एस. बाजवा यांनी योजना बनवली. त्यांनी 192 माऊंटन ब्रिगेड तयार करत त्याचे दोन विभाग केले. गोरखा रायफलला तिहेरी प्रदेश ताब्यात घेण्यास सांगण्यात आले. 22 जुलैला ही मोहीम सुरु झाली आहे. सी कंपनीचे नेतृत्व हेमांग गुरुंग यांनी केले. कॅप्टन अमित ऊल, रायफलमन धान बाहुदर आणि दिनेश गुरुंग यांनी शौर्य गाजवले. डी कंपनीने 24 जुलै रोजी त्यांना दिलेले लक्ष पूर्ण केले. दुसरा टप्पा 9 पॅरा फोर्सने आणि गोरखा रायफल ने झुलु ताब्यात घेतले. सुधीरकुमार आणि नाईक कौशल यादव यांनी शौर्य गाजवले.
बाल्टिक सेक्टर-
बाल्टिक सेक्टरमध्ये 8 ते 10 किलोमीटरवर पाकिस्तानने घुसखोरी केली होती. जुबर, कुकरथांग, खलुबार आणि पॉईंट5203, चुरुबर पोस्ट पाकिस्तानने ताब्यात घेतले होते.
खलुबार
बाल्टिक क्षेत्रात खलुबार येथे पाकिस्तानी सैन्य मोठ्या प्रमाणावर होते. 30 जुनला भारतीय सैन्याने खलुबार येथे ऑपरेशन सुरु केले. विकास बटालियनच्या साथीला 22 ग्रेनेडिअर्स सोबत होते.या कारवाईत मेजर अजित सिंग यांच्या तुकडीने सर्व संकटावर मात करत आगेकूच केली. यानंतर इतर तुकड्यांनी कारवाई केली आणि खलुबार ताब्यात घेण्यात आले.
जून महिन्याच्या शेवटपर्यंत 1/11 गोरखा रायफल पाकिस्तानी सैनिकाशी लढत होती. त्यांनी शत्रूला जुबर आणि चुरुबार सिस्पो, पश्चिम खलुबारमधये रोखले. 2 जुलैलै बटालियन याल्दोरमधून पुढे पॉईंट 4812 वर गेली. यानंतर गोरखा बटलियनने त्यांना दिलेली कामगिरी पूर्ण केली. लेफ्टनंट मनोज कुमार यांच्या तुकडीने खलुबार दक्षिणेतून आक्रमण करत ताबा मिळवला. कमांडिंग ऑफिसर कर्नल ललित राय आणि अजित सिंग यांनी 22 ग्रेनेडिअरच्या सहाय्याने हल्ला सुरु ठेवला. ललित राय यांचा गुडघा फुटला तरी त्यांनी लढाई सुरु ठेवली. नायक ज्ञानेंद्र कुमार राय, हवालदार भीम बहादूर देवान यांनी शौर्य गाजवले. 6 जुलै रोजी खलुबार भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतले.
पद्मा गो
पद्मा गो भाग परत मिळवण्यासाठी झालेल्या लढाईत नाईक सभेदार ताशी चाईपल यांनी शौर्य गाजवले. मेजर जॉन लेविस आणि कॅप्टन एन.के.बिष्णोई यांच्या तुकड्यांनी पद्मा गो मिळवण्यासाठी जोरदार आक्रमण केले. 9 जुलैला भारतीय सैन्याने हा भाग मिळवला. पॉईंट 4812, पद्मा गो आणि खलुबार गमावल्यामुळे बाल्टिक क्षेत्रात असणाऱ्या पाकिस्नानी सैन्याचे कंबरडे मोडले.
जुबर, थारु, ककरथांग
भारतीय सैन्याने 70 इन्फंट्री ब्रिगेड जुबर,थारु आणि कुकरथांग मिळवण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या. जुबर वर सातत्याने तोफांचा मारा करण्यात आला. 1 बिहारच्या तुकडीने 29 जूनला हल्ला केला आणि 30 जूनपर्यंत पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावले.
जुबर टॉप येथे जवळापास 5 दिवस गोळीबार सुरु होता. 1 बिहारच्या तुकडीने पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण सुरुच ठेवले होते. 6 जुलैच्या रात्री पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. मेजर हरी यांनी याचे नेतृत्व केले. 7 जुलैच्या दिवशी जुबर टॉप मिळवण्यात यश आले. 9 जुलैला थारु प्रदेश 1 बिहार तुकडीने मिळवला.
कुकरथांग
कुकरथांगवर येथे हल्ला 1/11 गोरखा रायफल्स ने 8जुलैला केला. त्यादिवशी पॉइंट 4821 परत मिळवला. दोन्ही बाजूंनी तोफांचा मारा झाला. डी कंपनी यामध्ये यशस्वी झाली. 9 जुलैला कुकरथांग मिळवण्यात भारतीय सैन्याला यश आले.