ETV Bharat / bharat

पुलावामाचे राजकारण करणाऱ्यांना देश कधी विसरणार नाही; त्यांचा बुरखा फाटला आहे - मोदी

पुलवामा हल्ल्यावरून झालेल्या राजकारणावरून पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते गुजरात मध्ये केवडिया येथे सरदार वलसरदार यांच्या जयंती निमित्त अभिवादन केल्यानंतर संबोधन करत होते. यावेळी त्यांनी जगभरातील सर्वच देशांनी दहशवादाच्या विरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले.

Pulwama attack
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Oct 31, 2020, 10:52 AM IST

Updated : Oct 31, 2020, 12:40 PM IST

अहमदाबाद - आज जगभरातील सर्वच देशांनी दहशवादाच्या विरोधात उभे राहण्याची गरज आहे. दहशतवाद आणि हिंसेमुळे कोणालाच फायदा होणार नाही. भारत यापूर्वी पासूनच दहशतवादाविरोधात लढा देत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते गुजरात मध्ये केवडिया येथे सरदार वलसरदार यांच्या जयंती निमित्त अभिवादन केल्यानंतर संबोधन करत होते.

पुलावामाचे राजकारण करणाऱ्यांना देश कधी विसरणार नाही

दहशवाद जागतिक समस्या-

गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक देशामध्ये जी परिस्थिती होत आहे. ज्या प्रकारे काही लोक दहशवाद्याचे समर्थन करत असल्याचे दिसून येत आहे. ती आज एक जागतिक समस्या निर्माण झाली असल्याचे म्हणत पतप्रधान मोदींनी आज पाकिस्तानचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. आजच्या परिस्थिती जगभरातील सर्वच देश आणि तेथील सत्ताधारी, सर्व धर्म पंथांनी दहशवादाच्या विरोधात एकत्र होण्याची गरज असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

देश तो स्वार्थ विसरला नाही-

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पुलवामा हल्ल्याच्या घटनेबाबत बोलताना पाकिस्तानसह विरोधकांवरही निशाणा साधला. ज्यावेळी पुलवामा हल्ल्यात आपले वीर जवान शहीद झाले म्हणून देश दु:खात होता. त्यावेळी काही लोक त्यात सहभागी न होता राजकीय स्वार्थ साधण्याचे काम करत होते. त्यांना देश कधी विसरणार नसल्याचे म्हणत मोदींनी पुलवामा हल्ल्यावरून सरकारवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यावेळी कोणकोणते आऱोप करण्यात आले हे सर्व देश विसरला नसल्याचेही मोदी म्हणाले.

राजकीय लोकांचा खोटा मुखवटा उघडा पडला-

देश हे कधीच विसरणार नाही की देशावर एवढा मोठा आघात झाला होता. त्यावेळी स्वार्थ आणि अंहकाराने भरलेली राजकीय वृत्ती कोणत्या स्तरावर पोहोचली होती. गेल्या काही दिवसात शेजारील देशातून ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत. ज्या प्रकारे तेथील संसदेत पुलवामा हल्ल्याचे सत्य समोर आले. त्यामुळे आपल्यातील राजकीय लोकांचा खोटा मुखवटा देशाच्या समोर आला असल्याचा निशाणा मोदी यांनी विरोधकांवर साधला आहे.

कोरोनामुळे जागतिक जनजीवन विस्कळीत-

कोरोना महामारीवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की हे अचानक आलेले संकट आहे. यामुळे जगभरातील मानवजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या महामारीच्या पुढे 130 कोटी देशवासियांनी आपले सामूहिक सामर्थ्य दाखवून दिले आहे. ते आश्चर्यकारक आणि अद्भूत असल्याचेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

आज कश्मीर विकासाच्या नव्या मार्गावरून मार्गक्रमण करत आहे. मग ते पूर्वोत्तर राज्यात शांति प्रस्थापित करणे असो किंवा तेथील विकासासाठी उचलेली पाऊले असो, या सगळ्या माध्यमातून देश आज एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचला असल्याचेही मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

Last Updated : Oct 31, 2020, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.