चुरू - देश सध्या कोरोना व्हायरसशी लढत आहे. डॉक्टर, नर्स, मेडिकल कर्मचारी आपला जीव धोक्यात घातून कोरोनाशी मुकाबला करत आहे. अशावेळी काही लोक मेडिकल टीमला सहकार्य करत नसल्याचे समोर आले होते. अशातच चुरू जिल्ह्यातही सर्वे करायला गेलेल्या मेडिकल स्टाफसोबत काही लोकांनी धक्काबुक्की केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चुरु जिल्हातील काही लोकं निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमातून परत आले होते. त्यातील पाच लोकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्या भागातील नागरिकांचा मेडिकल सर्वे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शहरातील वार्ड नंतर 5, 7 व 8 मध्ये गेलेल्या आशा कर्मचाऱ्यांना तेथील नागरिकांनी धक्काबुक्की केली. तसेच काहींनी तर अपशब्द वापरल्याचे काही आशा कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांनी आमच्याकडे पुरावे मागत, आम्हाला खाली ढकलल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.