ETV Bharat / bharat

थायलंडच्या महिलेचा कोलकाताच्या रुग्णालयात मृत्यू; कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय.. - कोरोना व्हायरस थायलंड

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला पोटाच्या विकारासाठी २१ जानेवारीला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. सोबतच नॉशिया (उलटीची भावना आणि मळमळ) आणि तापही असल्यामुळे तिला तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ती थायलंडमधून भारतात आली होती. भारतात येण्याआधी तिने नेपाळमध्येही मुक्काम केला होता.

Thai woman dies of Coronavirus like symptoms in Bengal hospital
थायलंडच्या महिलेचा कोलकाताच्या रूग्णालयात मृत्यू; कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय..
author img

By

Published : Jan 28, 2020, 9:39 AM IST

कोलकाता - एका खासगी रूग्णालयात ३२ वर्षीय थाय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. हा संशय खरा ठरल्यास, कोरोना विषाणूचा हा भारतातील पहिला बळी ठरू शकतो. चीनमध्ये आतापर्यंत या विषाणूने १०६ नागरिकांचा बळी घेतला आहे.

रूग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला पोटाच्या विकारासाठी २१ जानेवारीला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. सोबतच नॉशिया (उलटीची भावना आणि मळमळ) आणि तापही असल्यामुळे तिला तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. १८ जानेवारीपासूनच तिला ताप, मळमळ आणि पोटदुखी होत होती. हा त्रास वाढल्यामुळे २१ तारखेला रात्री तिला रुग्णालयात आणले गेले. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ती थायलंडमधून भारतात आली होती. भारतात येण्याआधी तिने नेपाळमध्येही मुक्काम केला होता.

या महिलेच्या मृत्यूबाबत भारतातील थाई वाणिज्य दूतावासाला कळवण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने तिच्या सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल मागवले आहेत. थायलंडमध्ये या विषाणूमुळे आतापर्यंत किमान आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा : 'कोरोना' व्हायरस : देशभरात ठिकठिकाणी आढळले संशयित रुग्ण; तपासणी सुरू

Intro:Body:

Thai girl dies of coronavirus like symptoms in Bengal hospital

Kolkata, Jan 28 (IANS) A 32-year-old Thailand national, suspected to be suffering from Coronavirus, died in a private hospital here on Monday.

Hospital sources said the woman was admitted to the hospital at 11 p.m. on January 21 and transferred to the ICU with stomach problem, nausea and fever.

She left Thailand in late November and also visited Nepal before coming to India.

"From January 18 she started haVing stomach problem, nausea and fever. As her condition deteriorated, she came to the hospital emergency 11 pm on January 21 and was admitted to the ICU," said sources.

The Thai consulate general here has been informed.

The West Bengal health department officials have sought all test reports of the deceased.

At least eight people have died in Thailand from deadly Coronavirus.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.