नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारवर मोठे संकट येऊन कोसळले आहे. याबाबत बोलताना, देशातील १.३ अब्ज लोकांची तपासणी करणे शक्य नाहीच तसेच व्यवहार्यही नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले आहेत. ते गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलत होते.
गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले, देशातील १३० कोटी नागरिकांचे परिक्षण करणे तर शक्य नाही. परंतु, ते व्यवहार्यही नाही. आरोग्य चाचणी डेटा आणि क्षमतेच्या तपशिलांबद्दल बोलताना ते म्हणाले, २७ मे पर्यंत आमची चाचणी क्षमता ही दररोज १ लाख ६० हजार आहे. आणि आम्ही आतापर्यंत ३२ लाख ४४ हजार ८८४ चाचण्या केल्या आहेत. २६ मे ला आम्ही एकूण १५ हजार २२९ चाचण्या केल्या, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी आम्ही देशातील १३० नागरिकांचे परिक्षण करण्याचे जरी म्हटले. तरीदेखील ही एक महागडी प्रक्रिया असून ती शक्य तर नाहीच मात्र, व्यवहारिकदृष्ट्याही परवडणारी नाही, असेही ते म्हणाले.
फेब्रुवारी २०२० च्या पहिल्या आठवड्यामध्ये पुण्याच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही) येथे फक्त एक प्रयोगशाळेत ही सुविधा होती. मात्र, आता देशातील एकूण ६२४ प्रयोगशाळेमध्ये सुविधांची संख्या वाढवण्यात आली आहे. यामध्ये, ४३५ सरकारी प्रयोगशाळा तर, १८९ एनबीएलच्या मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळा आहेत, असेही ते म्हणाले.
कोरोनावर आळा घालण्याकरता या संसर्गाचे अधिकाधिक प्रकरण शोधून काढण्यास आणि रोगाचा प्रतिबंध करण्यास प्राधान्य-आधारित आणि लक्ष्यित चाचणी उपयुक्त ठरेल. तसेच चाचणी सुविधांमध्ये सातत्य व गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या आमचा प्रयत्न आहे, असेही हर्ष वर्धन म्हणाले. आम्ही जास्तीत जास्त प्रकरणे शोधण्यासाठी चांगल्या स्थितीत येऊ, याची मला खात्री आहे, असेही ते यावेळी म्हणाले.