श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. शहराच्या चरार-ए-शरीफ या भागात सोमवारी सकाळीपासून चकमक सुरू होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे, एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
-
#BudgamEncounterUpdate: 01 #unidentified #terrorist killed. Operation going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/ynEnHYa1X0
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) September 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#BudgamEncounterUpdate: 01 #unidentified #terrorist killed. Operation going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/ynEnHYa1X0
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) September 22, 2020#BudgamEncounterUpdate: 01 #unidentified #terrorist killed. Operation going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/ynEnHYa1X0
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) September 22, 2020
आजच्या चकमकीबाबत ट्विट करत काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले, की मंगळवारी सकाळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, अद्यापही चकमक सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
यापूर्वी शुक्रवारीच जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे होते. तसेच, यादरम्यान दोन जवान जखमी झाले होते, आणि एका महिलेचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा : संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी केली 'सुधारीत बहुपक्षीयतेची' मागणी