ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा निवडणूक : मोदी-शाहसह अनेक नेत्यांच्या प्रचार सभेत दहशतवादी हल्ल्याची भीती

author img

By

Published : Oct 19, 2020, 7:01 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बिहारमध्ये प्रचार करणार आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बिहार विधानसभा निवडणूक
बिहार विधानसभा निवडणूक

पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बिहारमध्ये प्रचार करणार आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नेत्यांच्या प्रचार सभेत हल्ल्याची शक्यता, हाय अलर्ट जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये 12 प्रचार सभा घेणार आहेत. याची सुरवात येत्या 23 तारखेपासून होत आहेत. 23 तारखेला पंतप्रधान 8 तास बिहारमध्ये राहतील. भागलपूर, गया आणि सासाराम येथे ते संबोधित करतील. या दौऱ्यादरम्यान, नक्षली हल्ल्याची सुचना पोलीस मुख्यालयाला मिळाली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिहारमध्ये 18 प्रचार सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेतही दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी गुप्त माहिती मिळाली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकारी हेलिपॅडच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. भागलपूर येथे पंतप्रधानांच्या बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयपीएस पंकज राज यांना नियुक्त करण्यात आले आहे.

बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलीस मुख्यालयाने कंबर कसली आहे. कुख्यात गुन्हेगारांना राजधानी पाटणातील बूर तुरूंगातून दुसऱ्या तुरूंगात हलविण्यात आले आहे. त्याचबरोबर जामिनावर सुटलेल्या दोनशे गुन्हेगारांवरही सीसीए लागू करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.