ETV Bharat / bharat

तेलंगाणा पोलिसांनी १० कोरोना पॉझिटीव्ह इंडोनेशियन नागरिकांवर दाखल केला गुन्हा

तेलंगाणा पोलिसांनी 10 इंडोनेशियन नागरिकांविरोधात करीमनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण कोरोना पॉझीटीव्ह निघाले होते.

author img

By

Published : Apr 7, 2020, 1:32 PM IST

COVID-19 positive
तेलंगाणा पोलिसांनी १० कोरोना पॉझिटीव्ह इंडोनेशियन नागरिकांवर दाखल केला गुन्हा

हैदराबाद (तेलंगाणा) - तेलंगाणा पोलिसांनी 10 इंडोनेशियन नागरिकांविरोधात करीमनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण कोरोना पॉझीटीव्ह निघाले होते.

या सर्वांवर हैदराबादमधील शासकीय गांधी रुग्णालय इथे उपचार करण्यात आले आहे. या सर्वांवर परदेशी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नागरिकांनी दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर ते रेल्वेने प्रवास करून करीमनगरला आले होते. दोन एजंट आणि करीमनगरमधील चार लोकांवरही साथीच्या आजार कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

करीमनगर पोलीस आयुक्तालयाच्या टाउन पोलिस स्टेशनमध्ये परदेशी कायद्याच्या कलम 14 अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.इंडोनेशियन लोकांनी त्यांचे उपचार पूर्ण केले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी रात्री उशिरा सांगितले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एजंट्स आणि स्थानिक लोकांनी या इंडोनेशियन लोकांविषयी आणि त्यांच्या आरोग्यविषयक माहिती अधिकाऱ्यांना न दिल्याद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. दोन एजंटसह हे सर्व इंडोनेशियन नागरिक 14 मार्च रोजी एपी संपर्क क्रांती एक्स्प्रेसने रामागुंडमला पोहोचले होते. रामागुंडमहून ते खासगी वाहनाने करीमनगरला आले होते.

ते शहरातील एका मशिदीत थांबले होते आणि तबलगीच्या कामासाठी आले म्हणून शहरात फिरत होते. दोन दिवसानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्वांना हैदराबाद येथे हलवले आणि त्यांची चाचणी घेण्यात आली. त्या सर्वांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.