ETV Bharat / bharat

..त्यासाठी तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केले वीज कर्मचाऱ्यांचे अभिनंदन - कोरोना

कोरोना विरोधी लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी वीजेचे दिवे बंद करण्याचे आवाहन केले होते. याकाळात तेलंगणा राज्यातील वीजेचे व्यवस्थित नियमन केल्याबद्दल मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राज्याचे वीज मंत्रालय, ट्रान्स्को आणि जेन्कोच्या अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. मोदींच्या उपक्रमादररम्यान 1500 मेगावॅट वीजेची मागणी घटली होती.

telangana-cm-congratulates-state-electricity-dept-for-smoothly-handling-pms-lights-off-initiative
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी वीजेचे दिवे बंद उपक्रमावेळी उत्कृष्ठ कामगिरीसाठी केले वीज कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
author img

By

Published : Apr 6, 2020, 2:12 PM IST

हैदराबाद- तेलंगणा राज्यातील वीजेचे व्यवस्थित नियमन करत परिस्थिती उत्कृष्ठपणे हाताळल्याबद्दल मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राज्याचे ऊर्जा मंत्रालय, ट्रान्स्को आणि जेन्कोच्या अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. कोरोना विरोधी लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री विजेचे दिवे बंद करण्याचे आवाहन केले होते.

मोदींनी रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद करत घराच्या गॅलरीत मेणबत्ती, पणती, मोबाईलची फ्लॅश लाईट आणि बॅटरीचा उजेड करावा, असे आवाहन केले होते. या उपक्रमादररम्यान राज्यात 1500 मेगावॅट वीजेची मागणी घटली होती.

याकाळात तेलंगणा राज्यातील विजेचे व्यवस्थित नियमन केल्याबद्दल मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राज्याचे वीज मंत्रालय, ट्रान्स्को आणि जेन्कोच्या अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

रविवारी रात्री 9 वाजता नागरिकांनी घरातील वीजचे दिवे बंद केले मात्र राज्य वीज विभागाने योग्य नियोजन केल्यामुळे समस्या निर्माण झाली नाही. प्रत्येक मिनिटाला नियमन करण्याचे काम सुरु होते याकाळात वीजेची मागणी कमी होत होती, असे मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.

नरेंद्र मोदींच्या आवाहनला देशभरातील नागरिकांनी रविवारी रात्री नऊ वाजता दारासमोर उभे राहून मेणबत्त्या व पणत्या प्रज्वलित करुन तसेच टॉर्च आणि मोबाईलची लाईट लाऊन प्रतिसाद दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.