पाटणा - राष्ट्रीय जनता दलाने बिहार निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा जारी केला. ज्यामध्ये 17 विषयांवर प्राधान्यक्रमांवर जोर देण्यात आला आहे. शेतकरी, मजूर, आणि तरुणांना आकर्षित करणारी आश्वासने दिली आहेत. 'प्रण हमारा संकल्प बदलाव का', असे जाहीरनाम्याचे नाव आहे.
जाहीरनाम्यातील आश्वासने -
- रोजगार विषयाला जाहीरनाम्यात अव्वल स्थान आहे.
- पहिल्या मंत्रिमंडळात 10 लाख कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्यांची प्रक्रिया सुरू केली जाईल.
- रोजगार आणि स्वयंरोजगारात नियुक्त शिक्षकांना वेतनश्रेणी.
- सर्व कंत्राटी कर्मचार्यांना टिकवून ठेवण्याचे वचन
- समान काम समान वेतनाचे आश्वासन.
- सर्व विभागांत खाजगीकरण संपेल.
- सर्व सिंचन पंप सौर पंपमध्ये बदलले जातील.
- क्रीडा धोरणांतर्गत बिहारमध्ये क्रीडा विद्यापीठाची स्थापना.
- प्रत्येक विभागात एक मोठे स्टेडियम उभारले जाईल.
- सर्व सरकारी कर्मचार्यांना एका वर्षाच्या आत जुनी पेन्शन प्रणाली लागू होईल.
- टॉडी उद्योगाचे व्यापारीकरण केले जाईल.
- औद्योगिक क्षेत्रात व्यापारी सुरक्षा पथक तयार केले जाईल.
- तसेच बिहारमधील विद्यमान वीज दर कमी करण्याचे आश्वासन दिले.
- शेतकर्यांचे कर्ज आणि शेतजमिनीवरील भाडे माफ केले जाईल.
या जाहीरनाम्यात 17 प्रतिज्ञापत्रांचा समावेश -
आरजेडीच्या जाहीरनाम्यात, 10 लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले गेले आहे. या जाहीरनाम्यात 17 प्रतिज्ञापत्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये रोजगार, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक वारसा आणि राज्यातील सर्जनशील उद्योग, समुदाय विकास आणि दारिद्र्य निर्मूलन आणि शिक्षणाला विशेष स्थान देण्यात आले आहे.
नोकरीत स्थानिक धोरण -
जाहीरनाम्यात बचतगटांना आणखी बळकट करण्याचे आश्वासन देण्यात आले असून उच्च शिक्षण व रोजगार मिळू शकेल. राज्यातील कोणत्याही सरकारी नोकरीत स्थानिक धोरण राबविण्याचे आश्वासन देताना स्थानिक उमेदवारांना किमान 85 टक्के आरक्षण मिळावे, असे सांगण्यात आले आहे.
समान कामासाठी समान वेतन -
आरजेडीनेही सर्वांना 'समान कामासाठी समान वेतन' देण्याचे आश्वासन दिले आहेत. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याचेही म्हटलं आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी बिहारी तरुणांनी सरकारी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी फी आकारली जाणार नाही, असे जाहीरनाम्यात म्हटलं आहे. ही फक्त हवेतील आश्वासने नसून ती आम्ही पूर्ण करणार आहोत. बिहारमधील सरकारी पदे रिक्त आहेत. त्यांना भरून लोकांना नोकरी दिली जाऊ शकते, असे तेजस्वी यादव म्हणाले.