ETV Bharat / bharat

तेजस्वी यादव यांना पाहण्यासाठी उसळली गर्दी; कार्यकर्त्यांमध्येच झटापट

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांमध्ये गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यांची महनार विधानसभा मतदारसंघातील महीसौरमध्ये तेजस्वी यादव यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांमध्येच मारहाण झाल्याची घटना घडली.

author img

By

Published : Oct 30, 2020, 1:11 PM IST

Updated : Oct 30, 2020, 2:42 PM IST

तेजस्वी
तेजस्वी

पाटणा - बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता दोन टप्प्यांतील मतदान बाकी आहे. सत्तेत येण्यासाठी विविध पक्षांकडून राज्यभर प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची महनार विधानसभा मतदारसंघातील महीसौरमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. तेजस्वी यादव यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मात्र, यावेळी काही कार्यकर्त्यांमध्येच झटापट झाल्याची घटना घडली.

तेजस्वी यादव यांच्या सभांमध्ये गर्दी

राजद उमेदवार वीणा सिंह यांच्याकरीता प्रचारसभा घेण्यासाठी तेजस्वी यादव महनारमध्ये पोहचले. तेव्हा कार्यकर्त्यांनी मंचावर जाण्यासाठी गर्दी केली. तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. मात्र, यावेळी तेजस्वी यादव मंचावर उपस्थित नव्हते. तेजस्वी यादव मंचावर येईपर्यंत कार्यकर्त्यांची समजूत काढून प्रकरण शांत करण्यात आले. तसेच तेजस्वी यादव यांना पाहण्यासाठी काही लोकांनी घराच्या छतावर गर्दी केल्याने छत कोसळल्याचीही घटना घडली आहे. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे.

तेजस्वी यादव यांनी प्रचार सभेत एनडीएवर जोरदार निशाणा साधला. 'सरकारने शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. मात्र, यावेळी विकासाठी राष्ट्रीय जनता दलाचे सरकार स्थापन करा, असे तेजस्वी यादव म्हणाले.

निकाल 10 नोव्हेंबरला -

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागेसाठी मतदान पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. तर मतमोजणी ही 10 नोव्हेंबरला होणार आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 123 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. येत्या 10 तारखेला कोणता पक्ष कोणाला मात देतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Last Updated : Oct 30, 2020, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.