पाटणा - बिहारमध्य कोरोना महामारीने कहर केला आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीसोबत मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. मात्र, राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आरजेडीने युतीतील काही मित्र पक्षांच्या साथीने कोरोना विषाणूच्या महामारी काळात निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे सत्ताधारी जदयू आणि भाजप पक्ष निवडणुका घेण्यासाठी आग्रही आहेत. यावरून विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी निशाणा साधला आहे.
महामारीत नागरिकांची सुरक्षा महत्वाची-
विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी आगामी निवडणुकीबाबत मत व्यक्त करताना 'बिहार आता जगातील कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ लागले आहे, ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी लवकर प्रयत्न नाही केल्यास परिस्थिती आणखीन खराब होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. निवडणुका नागरिकांच्या भल्या करता असतात, आता निवडणुका घेतल्यास नागरिकांच्या जीवास धोका संभवू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याला प्रथम प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली.
तेजस्वी यादव म्हणाले, की आम्ही आमच्या मित्र पक्षासह एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे, की निवडणुका घेण्यासाठी ही योग्य वेळ नाही. नागरिकांच्या जीवितास धोका आहे. अशा परिस्थितीत निवडणुिका टाळल्या पाहिजेत, जर जनताच राहिली नाहीतर मग लोकशाहीला घेऊन करायचे काय, लोकशाहीचे काय करते असा सवाल उपस्थित केला आहे.
'राष्ट्रपती राजवट लागू करण्यास हरकत नाही'
यावेळी तेजस्वी यांना नितीश कुमार सत्तेत असताना तुम्हाला निवडणूक लढवायची नाही का? असा प्रश्न विचारला असता, 'माझ्या इच्छेने काय होणार आहे, जर परिस्थिती नियंत्रणात नसेल तर निवडणुका घेणे कितपत योग्य आहे,अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच संविधानिक नियमांनुसार राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू होत असेल तर काहीच अडचन नसल्याचे तेजस्वी म्हणाले.
तसेच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या लोक जनता पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही निवडणुका घेणे उचित नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यावर तेजस्वी यांनी विचारणा केली असता, ते म्हणाले ज्यांच्याकडे मानवता आहे तो प्रत्येकजण निवडणुका न लढवण्याचाच विचार व्यक्त करेल.