नवी दिल्ली - देशातील पहिल्या सेमी हायस्पीड 'वंदे भारत एक्सप्रेस'मध्ये आज सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तुंडला स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पहिल्याच दिवशी गाडीला उशीर झाला आहे.
वाराणसीहून नवी दिल्लीच्या दिशेने परतीचा प्रवास करत असताना वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तुंडला स्थानकाजवळ १५ किमी अंतरावर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे गाडी ४ तास खोळंबली होती. यामुळे ४ कोचमध्ये अंधार पडला होता. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दुरुस्ती केली. त्यानंतर गाडीचा वेग कमी करून ४० ते ५० किमी ताशी करण्यात आला. सकाळी ९.१५ वाजता गाडी नवी दिल्लीला रवाना करण्यात आली.