रायपूर - देशभरात कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे ऑनलाईन शाळा भरवण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी दुर्गम भागातील अदिवासी लोकांना मोबाईल आणि इंटरनेट परवडू शकत नाही. अशा विद्यार्थ्याना शिकवण्यासाठी कोरबा शहरातील दोन शिक्षकांनी पुढाकर घेत अभिनव उपक्रम राबवला आहे.
कोरबा शहरापासून सुमारे 35 ते 40 कि.मी. अंतरावर असलेल्या गाणियान आणि खेतारपारा या गावात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या मुलांना शिक्षण देत आहेत. ही शाळा गावातील झाडा खाली किंवा सार्वजनीक इमारतीमध्ये भरवली जात आहेत. या शाळेला 'मोहल्ला स्कुल' असे गावकरी संबोधत आहेत.
अनलॉक-1 पासूनच या शाळा भरवण्यात येत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. दररोज 15 ते 20 जण शाळेत येत आहेत. सुरक्षेसाठी या विद्यार्थ्यांना मास्क देण्यात आले आहे. 'मोहल्ला स्कुल' ही संकल्पना परिसरातील इतर भागांमध्येही राबवली जात आहे.
लॉकडाउन संपल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्या घरी गेलो. मुलांना या मोहल्ला शाळांमध्ये पाठविण्याचे पालकांना सांगितले. पावसाळ्यामुळे आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, अशा प्रकारच्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे, असे शिक्षिका आशा सिंग यांनी सांगितले.