नवी दिल्ली - मेव्हणीसमोर आपल्याला टोमणा मारला या क्षुल्लक कारणावरून दिल्लीतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. पत्नीने तिच्या बहिणीसमोर त्याला उशिरा उठण्यावरून टोमणा मारला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फजरूद्दीन (४५) असे आरोपीचे नाव आहे. तर, समीना असे मृत पत्नीचे नाव आहे. ते दोघे गाझियाबादचे रहिवासी असून, समीनाच्या वैद्यकीय उपचारांकरीता ते दिल्लीत आले होते. दिल्लीच्या संगम विहार परिसरात ते फझरूद्दीनच्या भावासोबत राहत होते. फझरूद्दीन एक इलेक्ट्रिशिअन म्हणून काम करतो. या दोघांना तीन मुले आहेत.
काल (मंगळवार) सकाळी समीना तिच्या बहिणीसोबत गप्पा मारत असताना, तिने फझरूद्दीनला उशीरा उठण्यावरून टोमणा मारला. यावरून चिडलेल्या फझरूद्दीनने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर आपण आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबूली दिली. याप्रकरणी नेब सराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा : 'महिलांवरील अत्याचार थांबववण्यासाठी कडक कायदे करा'