ETV Bharat / bharat

मदुराईमधील जल्लीकट्टू स्पर्धेत ७०० हून अधिक बैल सहभागी - जल्लीकट्टू काय आहे

गेल्या २०१४ मध्ये भारतीय पशू कल्याण मंडळ आणि 'पेटा' या प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या स्पर्धेवर स्थगिती आणली होती. मात्र, हा पारंपरिक खेळ असल्यामुळे तामिळनाडूमधील लोकांनी या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. त्यामुळे २०१७ मध्ये यासंबंधी असलेल्या कायद्यांमध्ये सुधारणा करत ही बंदी हटवली गेली होती. यावर्षी ३१ जानेवारीला राज्यभरात होणाऱ्या जल्लीकट्टू स्पर्ध्येमध्ये एकूण दोन हजारांहून अधिक बैल सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tamil Nadu: 700 bulls participate in Jallikattu in Madurai
मदुराईमधील जल्लीकट्टू स्पर्धेत ७०० हून अधिक बैल सहभागी..
author img

By

Published : Jan 16, 2020, 5:12 PM IST

चेन्नई - तामिळनाडूच्या मदुराईमध्ये झालेल्या जल्लीकट्टू स्पर्धेमध्ये जवळपास ७०० बैलांनी सहभाग घेतला आहे. तामिळनाडूमध्ये साजऱ्या होणाऱ्या पोंगल या सणाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित केली जाते.

मद्रास उच्च न्यायालयाने विशेष समितींच्या देखरेखीखाली या स्पर्धांचे आयोजन करण्याची परवानगी दिली होती. या समितींचे प्रमुख हे निवृत्त न्यायाधीश असावेत अशी अटही न्यायालयाने नमूद केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी या स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. तसेच मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २१ वर्षांहून कमी वय असणाऱ्या तरुणांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही, असे आदेश दिले होते.

गेल्या २०१४ मध्ये भारतीय पशू कल्याण मंडळ आणि 'पेटा' या प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या स्पर्धेवर स्थगिती आणली होती. मात्र, हा पारंपारिक खेळ असल्यामुळे तामिळनाडूमधील लोकांनी या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. त्यामुळे २०१७ मध्ये यासंबंधी असलेल्या कायद्यांमध्ये सुधारणा करत ही बंदी हटवली गेली होती.

यावर्षी ३१ जानेवारीला राज्यभरात होणाऱ्या जल्लीकट्टू स्पर्धेमध्ये एकूण दोन हजारांहून अधिक बैल सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : 'अमेरिकेनं ज्या पद्धतीनं दहशतवादाचा सामना केला, तसंच आपल्यालाही करावं लागेल'

Intro:Body:

मदुराईमधील जल्लीकट्टू स्पर्धेत ७०० हून अधिक बैल सहभागी..

चेन्नई - तामिळनाडूच्या मदुराईमध्ये झालेल्या जल्लीकट्टू स्पर्धेमध्ये जवळपास ७०० बैलांनी सहभाग घेतला आहे. तामिळानाडूमध्ये साजऱ्या होणाऱ्या पोंगल या सणाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित केली जाते.

मद्रास उच्च न्यायालयाने विशेष समितींच्या देखरेखीखाली या स्पर्धांचे आयोजन करण्याची परवानगी दिली होती. या समितींचे प्रमुख हे निवृत्त न्यायाधीश असावेत अशी अटही न्यायालयाने नमूद केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी देण्यास नकार दिला. त्यामुळे, राज्यभरात ठिकठिकाणी या स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. तसेच, मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २१ वर्षांहून कमी वय असणाऱ्या तरुणांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही, असे आदेश दिले होते.

२०१४ मध्ये भारतीय पशू कल्याण मंडळ आणि 'पेटा' या प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने याचिका दाखल केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने या स्पर्धेवर स्थगिती आणली होती. मात्र, हा पारंपारिक खेळ असल्यामुळे तामिळनाडूमधील लोकांनी या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. त्यामुळे २०१७ मध्ये यासंबंधी असलेल्या कायद्यांमध्ये सुधारणा करत, ही बंदी हटवली गेली होती.

यावर्षी ३१ जानेवारीला राज्यभरात होणाऱ्या जल्लीकट्टू स्पर्ध्येमध्ये एकूण दोन हजारांहून अधिक बैल सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.