हैदराबाद - तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात असणाऱ्या अब्दुल्लापुरमेट तालुक्याच्या तहसिलदार विजया रेड्डी यांना त्यांच्या कार्यालयातच जिवंत जाळल्याची घटना आज घडली. एका व्यक्तीने तहसिलदार कार्यालयात घुसून विजया यांच्यावर पेट्रोल टाकत त्यांना पेटवून दिले, त्यानंतर स्वतःलाही त्याने पेटवून घेतले.
-
Telangana: An unknown person, today, poured kerosene on Abdullahpurmet Tehsildar, Vijaya & set her ablaze allegedly over discrepancies in his land records. She succumbed to her injuries at a hospital. Later, he set himself on fire & is admitted to a hospital; Case registered. pic.twitter.com/vHW1pWjz0u
— ANI (@ANI) November 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Telangana: An unknown person, today, poured kerosene on Abdullahpurmet Tehsildar, Vijaya & set her ablaze allegedly over discrepancies in his land records. She succumbed to her injuries at a hospital. Later, he set himself on fire & is admitted to a hospital; Case registered. pic.twitter.com/vHW1pWjz0u
— ANI (@ANI) November 4, 2019Telangana: An unknown person, today, poured kerosene on Abdullahpurmet Tehsildar, Vijaya & set her ablaze allegedly over discrepancies in his land records. She succumbed to her injuries at a hospital. Later, he set himself on fire & is admitted to a hospital; Case registered. pic.twitter.com/vHW1pWjz0u
— ANI (@ANI) November 4, 2019
या घटनेत विजया यांचा मृत्यू झाला, तर हल्लेखोराची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र विजया यांचा जागीच मृत्यू झाला होता. विजया यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तहसिलदार कार्यालयातील दोन कर्मचारीही जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये वेगाने पसरत आहे. तसेच, हे का घडले याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्कही लावले जात आहेत. हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरु आहे.