लखनऊ - उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमध्ये स्वामी चिन्मयानंद यांच्या आश्रमाला टाळे ठोकण्यात आले आहे. एका विद्यार्थिनीने केलेल्या गंभीर आरोपांनंतर, आज सकाळी विशेष तपासणी पथक (एसआयटी) या 'दिव्य धाम आश्रमा'त पोहोचली. त्यानंतर, त्यांनी चिन्मयानंद यांचे राहते घर सोडून, आश्रमातील इतर खोल्यांना बंद केले.
आज पहाटे चारच्या दरम्यान एसआयटीचे पथक स्वामी सुखदेवानंद पदवी महाविद्यालयाच्या मुमुक्षु आश्रमात पोहोचले होते. त्यानंर, स्वामी चिन्मयानंद यांच्या दिव्य धाम आश्रमात जाऊन त्यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, थोड्याच वेळात एसआयटीचे पथक, त्या विद्यार्थिनीला दिव्य धाम आश्रमात नेईल, आणि त्यानुसार पुढील तपास होईल.
हेही वाचा : डी. के. शिवकुमार १७ सप्टेंबरपर्यंत 'ईडी'च्या ताब्यात