ETV Bharat / bharat

प्रत्येक परदेशी उत्पादनावर बहिष्कार घालणे असा स्वदेशीचा अर्थ नव्हे - मोहन भागवत - Rashtriya Swayamsevak Sangh

‘कोविड -19 या महामारीमुळे एकाच प्रकारचे अर्थशास्त्रीय मॉडेल जगभरात सगळीकडे योग्य ठरू शकणार नाही, हेच सिद्ध झाल्याचे ते म्हणाले. यातून जागतिकीकरणाचे ही अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत, हेही ही समोर आले आहे, असे ते म्हणाले. सर्वांनी ’जगाला एक बाजार नव्हे तर, एक कुटुंब' समजले पाहिजे, हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी जोर देऊन सांगितले.

सरसंघचालक मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत
author img

By

Published : Aug 13, 2020, 5:21 PM IST

Updated : Aug 13, 2020, 5:40 PM IST

नवी दिल्ली - ‘प्रत्येक परदेशी उत्पादनावर बहिष्कार घालणे, असा स्वदेशीचा अर्थ नाही. आपल्यासाठी योग्य असलेली वस्तू आपण खरेदी करू. तिही आपण स्वतः ठरवलेल्या अटींवर. जगभरातील आपल्यासाठी जे चांगले आहे, त्या सर्व बाबी आपण घेऊ, असा याचा अर्थ आहे,’ असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्हर्च्युअल बुक लॉन्च कार्यक्रमात केले आहे.

आपण परदेशातून जे घेतो ते आपापल्या गरजेनुसार असले पाहिजे स्वदेशी या संकल्पनेत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि परकीय गुंतवणूक व वस्तूंचा ओघ रोखणे याचा आग्रह धरला आहे.

आरएसएस प्रमुखांनी स्वावलंबी आणि स्वदेशी होणे अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. ‘कोविड -19 या महामारीमुळे एकाच प्रकारचे अर्थशास्त्रीय मॉडेल जगभरात सगळीकडे योग्य ठरू शकणार नाही, हेच सिद्ध झाल्याचे ते म्हणाले. यातून जागतिकीकरणाचे ही अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत, हेही ही समोर आले आहे, असे ते म्हणाले. याच्या पुढे जाऊन स्वावलंबी असलेल्या देशांमध्ये परस्पर सहकार्याचीही आवश्यकता आहे. सर्वांनी ’जगाला एक बाजार नव्हे तर, एक कुटुंब' समजले पाहिजे, हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी जोर देऊन सांगितले.

भारताचे सध्याचे आर्थिक धोरण समृद्धीकडे नेणारी असल्याचे भागवत म्हणाले. ‘स्वातंत्र्यानंतर आपण आपले आर्थिक धोरण सुरू ठेवले नाही. आपण पाश्चिमात्य आणि इतर परदेशांच्या प्रभावामुळे स्वतःचे नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी असे केले. मात्र, यामुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली उत्पादने आणि तंत्रज्ञान परदेशी वस्तूंच्या अंमलाखाली येऊन दुर्लक्षित झाले. मात्र, आता आपण पुन्हा चांगल्या दिशेने प्रगती करत आहोत, ही बाब चांगली आहे,' असे आरएसएस प्रमुख म्हणाले.

आपण सर्वसमावेशक दृष्टी आणि अनुकूल धोरणे ठेवून आपले आर्थिक ध्येय निश्चितपणे गाठण्यासाठी योग्यप्रकारे अंमलबजावणी केली पाहिजे. याविषयी आपण आत्मविश्वासाने विचार केला पाहिजे असे ते म्हणाले.

‘भारतामध्ये सध्या अशा समाजाची गरज आहे, जो जगभरातील उत्पादनांच्या आधारावरून स्थानिक पातळीवर उत्पादने तयार करण्यावर विश्वास ठेवेल,’असे भागवत पुढे म्हणाले. ‘जी उत्पादने भारतातील परंपरागत किंवा स्थानिक नाहीत, केवळ अशाच प्रकारची उत्पादने, वस्तू किंवा तंत्रज्ञानाची आपण आयात केली पाहिजेत आणि त्यातही भारतीय पद्धतीनुसार आवश्यक ते बदल, सुधारणा केल्या पाहिजेत,’ असे ते पुढे म्हणाले.

Last Updated : Aug 13, 2020, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.