नवी दिल्ली - माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्रोलरला चोख उत्तर दिले आहे. एक दिवस शीला दीक्षीत यांच्यासारखी तुमची ही आठवण येईल असे एका ट्रोलरले सुषमा स्वराज यांना म्हटले होते. यावर सुषमा यांनी तुमच्या या भावनेसाठी मनपुर्वक धन्यवाद असे उत्तर दिले आहे.
-
Is bhawana ke liye apko mera agrim dhanyawad.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I thank you in anticipation for this kind thought. https://t.co/pbuW6R6gcE
">Is bhawana ke liye apko mera agrim dhanyawad.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 21, 2019
I thank you in anticipation for this kind thought. https://t.co/pbuW6R6gcEIs bhawana ke liye apko mera agrim dhanyawad.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 21, 2019
I thank you in anticipation for this kind thought. https://t.co/pbuW6R6gcE
शनिवारी दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांनी अखेरचा श्वास घेतला. संपुर्ण देशभरात शोकाकूल वातावरण होते. सुषमा स्वराज यांनी टि्वट करत दु:ख व्यक्त केले. 'शीला दीक्षित यांच्या निधनाची बातमी एकून खूप दु:ख झाले. आम्ही राजकारणात एकमेकांचे विरोधी होतो. मात्र व्यक्तीगत जीवनात आम्ही चांगल्या मैत्रिणी ही होतो. शीला ह्या एक चांगल्या व्यक्ती होत्या', असे सुषमा यांनी टि्वटमध्ये म्हटले.
सुषमा स्वराज ह्या टि्वटरवर नेहमीच सक्रिय असतात. यापुर्वीदेखील त्यांनी अनेक ट्रोलरची बोलती बंद केली आहे. टि्वटरवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करताना त्या पाहायला मिळाल्या आहेत. अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुषमा स्वराज यांच्या कामाचे कौतुक केले आहे.