ETV Bharat / bharat

चाहुल मृत्यूच्या भविष्यवाणीची : ११ पैकी ५ चित्रपटांमध्ये मृत्यू...

वयाच्या ३४ व्या वर्षी सगळ्यांचीच 'बकेट लिस्ट' नसते. पण या आठवड्यात आत्महत्या केलेल्या सुशांतची होती. एवढेच नाही तर २०१३ मध्ये ‘काय पो चे’ चित्रपटातून दमदार पदार्पण करणाऱ्या सुशांतने एकूण ११ चित्रपट केले आणि त्यातल्या ५ चित्रपटात पडद्यावर त्याचा मृत्यू होतो.

author img

By

Published : Jun 20, 2020, 12:23 PM IST

sushant singh rajput death : Chronicle of a death foretold
चाहुल मृत्यूच्या भविष्यवाणीची : ११ पैकी ५ चित्रपटांमध्ये मृत्यू...

मुंबई - सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्याकडे पाहताना त्यातच कदाचित त्याच्या मृत्यूच्या भविष्यवाणीची जाणीव होऊ शकते. त्याने ट्विटरवर टाकलेल्या चित्राकडे पाहा. १८८९ मध्ये 'विन्सेट वॅन गो' यांनी काढलेल्या 'द स्टॅरी नाईट'चे ते चित्र होते. त्याच्या ब्रेकडाऊननंतरच्या वर्षातले. या विकृतीचीच ही चाहुल होती किंवा ३ जूनची त्याची इन्स्टाग्रामची पोस्ट पाहा. त्यात २००२ मध्ये हे जग सोडून गेलेल्या आईचा फोटो होता आणि त्याखाली लिहिले होते, धुसर झालेला भूतकाळ आसवांमधून गेला उडून, अनंत स्वप्नांमध्ये स्मितहास्य गेलं बुडून, या दोन्हीमध्ये हिंदोळे घेतेय आयुष्य, कधी या काळात कधी त्या काळात.

वयाच्या ३४ व्या वर्षी सगळ्यांचीच 'बकेट लिस्ट' नसते. पण या आठवड्यात आत्महत्या केलेल्या सुशांतची होती. एवढेच नाही तर २०१३ मध्ये 'काय पो चे' चित्रपटातून दमदार पदार्पण करणाऱ्या सुशांतने एकूण ११ चित्रपट केले आणि त्यातल्या ५ चित्रपटात पडद्यावर त्याचा मृत्यू होतो.

चित्रपटात ईशान सगळ्यांवरच प्रभाव पाडणारा. शेवटच्या दृश्यात अली हाश्मी भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच खेळतोय आणि सूर्यास्तामध्ये सुशांत आनंदाने निघून जातो. चित्रपटाच ईशानचा मृत्यू दाखवायचा हा निर्णय दिग्दर्शक अभिषेक कपूरने जाणीवपूर्वक घेतला. चित्रपट चेतन भगतच्या 'द ३ मिसटेक्स ऑफ माय लाइफ' या पुस्तकावर होता. चित्रपटाचा शेवट पुस्तकापेक्षा वेगळा होता. तो मुद्दाम बदलला. गोध्रा ट्रेन हत्याकांड आणि गुजरात दंगल याची तीव्रता, दु:ख दाखवण्यासाठी कपूरने चित्रपटातल्या सर्वात लाडक्या व्यक्तिरेखेचा मृत्यू मुद्दामच दाखवला.

दिग्दर्शक दिनेश विजनचा राबता (२०१७) पुनर्जन्मावर होता. त्याचा एक अवतार मरतो आणि दुसऱ्या जन्मात तो शिव कक्कर होतो. त्याला बुडण्यापासून एक मुलगी वाचवते. केदारनाथ (2018) चित्रपटात उत्तराखंड इथे २०१३ ला आलेल्या पुराची पार्श्वभूमी आहे. त्यात त्याने मुस्लीम गाईडची भूमिका साकारली होती. तो मंदिराच्या पुजाऱ्याच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तिला आणि इतरांना वाचवण्यासाठी बचावासाठी आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तो स्वत:ची जागा दुसऱ्यांना देतो. शेवटच्या दृश्यात पृथ्वी त्याला गिळंकृत करण्याआधी तो त्याचा आवडता अभिनेता शाहरुख खानसारखा हात पसरतो. आता त्याच्या मृत्यूनंतर हे सगळे पाहणे कठिण होऊन जाते.

अभिषेक चौबेच्या सोनचिडिया (२०१९) मध्ये त्याची व्यक्तिरेखा लखनाची होती. हा डाकूंच्या आयुष्यावरचा चित्रपट. चित्रपटाचा शेवट त्याच्या लढवय्या मृत्यूने होतो. आशुतोष राणा हा त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी त्याला झाडामागे लपून मारतो. सुशांतच्या मृत्यूनंतर चौबे म्हणाला, 'चित्रपटात त्या क्षणी लखनाच्या समोर वैकल्पिक आयुष्य होते. माझ्या डोक्यात याचा वेगळाच अर्थ होता. आता हे जीवनच संपून गेले आहे.'

छिछोरे चित्रपटात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या मुलाला तो सांगतो, 'आपला निकाल नाही ठरवत तुम्ही अयशस्वी आहात की नाही, तर तुमचे प्रयत्न हे ठरवतात.’ सुशांतच्या मृत्यूनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्या शेवटच्या चित्रपटात हॅपी एण्डिंगची अपेक्षा ठेवणाऱ्या प्रेक्षकांची निराशा होणार आहे. 'द फाॅल्ट इन अवर स्टार्स' या चित्रपटाचा रिमेक असलेला 'दिल बेचारा' हा ऑनलाइन रिलीज होणार आहे. त्यातला मुलगा आणि मुलगी कॅन्सरने आजारी असतात. चित्रपटभर मुलगी गंभीर आजारी असतानाही आश्चर्य म्हणजे मुलाचा मृत्यू होतो.

प्रेक्षकांना धरून ठेवण्यासाठी सिनेमॅटिक मृत्यू हे प्रभावी ठरतात. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या करियरमध्ये हे सिद्ध झाले. शाहरुख खान चित्रपटात अंदाजे १७ वेळा मृत्यू पावला आहे, तर बच्चन २६ वेळा चित्रपटात हे जग सोडून गेलेत. त्यांच्या मृत्यू दृश्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मग अमिताभ बच्चन यांचे दिवार (१९७५) मधले आईच्या मांडीवर प्राण सोडणे असो ते देवदास (२००२) मधले शाहरुख खानचा मृत्यू आणि ऐश्वर्याच्या पारोने आपल्या पेटत्या पदराने हवेलीत धावत जाणे, दरवाजे बंद होणे असो. ही दृश्ये कमालीची लोकप्रिय ठरली.

सुशांत सिंह राजपूत हा हुशार होता. तो खगोलशास्त्रही समजून घेऊ शकत होता आणि विवेकानंदांचे म्हणणेही. तो शामक दावरच्या नृत्य ग्रुपमधला शेवटच्या रांगेतला डान्सर होता. त्याला कष्ट आणि संघर्ष याची जाणीव होती. त्याने ऑक्टोबर २०१९ मध्ये ट्विट केले होते, 'पश्चिमी संस्कृती म्हणते, आपण वाईट गोष्टींवर विजय मिळवून त्या कमी करू, तर भारतीय संस्कृती म्हणते आपण सहनशीलतेने वाईट गोष्टींवर मात करू शकतो. हे दुसरे-तिसरे काही नसून सकारात्मक आनंद घेणे असते. हे परस्पर विरोधी दिसले तरी ध्येय सारखेच असते. आपण सगळेच आपापल्या आयुष्याच्या जाळ्यात गुरफटले असतो. चला आपण एकमेकांना उन्नतीच्या मार्गावर एकमेकांना प्रोत्साहित करुया.'

त्याचबरोबर त्याला प्रसिद्धी आणि आयुष्य हे अशाश्वत आहे, हे माहीत होते. डिसेंबर २०१८ मध्ये रुमीचे म्हणणे मांडत त्याने ट्विट केले होते, 'सावलीप्रमाणे मी आहे आणि मी नाहीही.' कदाचित काळाने साथ दिली असती तर त्याला प्रकाशझोतापासून दूर जाण्याचा मार्ग मिळाला असता. नाकारलेले चित्रपट, न पाळलेली वचने आणि हुकलेल्या संधी यांच्यापासून तो दूर जाऊ शकला असता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.