गांधीनगर : गुजरातच्या सूरतमध्ये असलेल्या एका कापड कारखान्याला भीषण आग लागली आहे. याठिकाणी अग्निशामक दलाचे दहा बंब दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत सुमारे सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या ए. के. रोडवर असणाऱ्या या कारखान्यात दुपारी तीनच्या सुमारास ही आग लागली. इलेक्ट्रिक मोटरमध्ये झालेल्या एका स्फोटामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.