नवी दिल्ली - जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी ही याचिका फेटाळली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी संदर्भात विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती.
कोरोनासारखी महामारी पुढील काळातही सुरू राहील. मात्र यासाठी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालता येणार नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
या याचिकेवर न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरणारे वकील अलख अलोक यांनाही न्यायालयाने फटकारले आहे, कारण अलोक यांनी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थितीत सुनावणी सुरू करण्यासंदर्भात विनंती केली होती