नवी दिल्ली - सध्या आपला देश कठीण प्रसंगातून जात आहे. तसेच देशात हिंसाचाराचे प्रमाण वाढले असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठानं याचिकेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. पहिल्यांदाच कुणी एखादा कायदा संवैधानिक घोषित करण्याची विनंती करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण सुनावणी केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) संवैधानिक घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने आज नकार दिला आहे.
हिंसाचार थांबल्यानंतरच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.