ETV Bharat / bharat

राम मंदिर निर्माणासाठी अयोध्येतील जमीन अधिग्रहीत करा, सुब्रमण्यम स्वामींचे मोदींना पत्र

author img

By

Published : Jun 3, 2019, 8:32 AM IST

कलम ३०० (अ) नुसार माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी कलम ३०० नुसार रामजन्म भूमी अधिग्रहीत केलेली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय प्रश्न उपस्थित करू शकत नसल्याचे स्वामी म्हणाले.

सुब्रमण्यम स्वामींचे मोदींना पत्र

नवी दिल्ली - भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिरासाठी अयोध्येतील जमीन अधिग्रहीत करण्याची मागणी केली आहे. मोदींना एक पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली. त्याचबरोबर रामसेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषीत करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

राम मंदिराची जमीन अधिग्रहीत करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही. कारण १९९३ साली माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी आधीच ही जमीन अधिग्रहीत केलेली आहे, असे स्वामी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

subramanian swamy writes letter to modi
सुब्रमण्यम स्वामींचे मोदींना पत्र

अयोध्या जन्मभूमीचा वाद न्यायालयात प्रलंबीत आहे. मोदी सरकारने जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून वादग्रस्त स्थळाजवळील ६७ एकर अतिरिक्त जमीन मूळ मालक आणि राम जन्मभूमी न्यास यांना परत करण्याची मागणी केली होती. राम मंदिर उभारणीसाठी राम जन्मभूमी न्यास या समितीची स्थापना करण्यात आली होती.

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील मागणी चुकीची होती. त्यांना जमीन अधिग्रहीत करण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. कारण रामजन्मभूमी त्यांच्याच ताब्यात आहे. सरकारला जमीन अधीग्रहीत करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी घेण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.