कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये राजकीय हत्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्ते या हत्यांसाठी राज्य सरकारचा निषेध करत बिपीन बिहारी गांगुली मार्गावरून लाल बाजारच्या दिशेने निघाले होते. आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या शिवाय पाण्याचे फवारे देखील सोडले.
पोलिसांच्या कारवाईनंतर भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा घेऊन ‘जय श्रीराम’ ही घोषणा देत ममता सरकारचा तीव्र निषेध करण्यास सुरुवात केली. यामुळे येथील परिस्थिती अधिकच चिघळताना दिसत आहे.
'ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगालमध्ये हिंसा होत आहे. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे हे घडत आहे. भाजप देशभरात आहे. तिथे हिंसेचे प्रकार घडत नाहीत. बंगाल व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी हिंसेच्या घटना पहायला मिळत नाहीत. असे का?' असा सवाल भाजपचे सचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. 'बंगाल हिंसेमध्ये होरपळत आहे. ममता बॅनर्जींनी गुजरातमध्ये जाऊन तिथल्या सुधारणा पहाव्यात. आम्ही बंगाल गुजरातपेक्षाही चांगला करू. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हा निश्चय केला आहे,' असे ते म्हणाले.
भाजपने लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये १८ जागा जिंकत तृणमूल काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तृणमूलला २२ जागांवर रोखण्यात यश मिळवले आहे. या ममतांसाठी मोठा धक्का ठरला आहे. तसेच, डावे पक्षही मर्यादित संख्येतच आहेत.
Intro:Body:
struggling-in-west-bengal-police-take-hard-action-against-the-bjps-karykartas-in-kolkatta-msr-
struggle, west bengal, police, bjp workers, tmc, kolkatta
-----------------
पश्चिम बंगालमध्ये संघर्ष शिगेला, कोलकात्यात भाजपाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार
पश्चिम बंगालमध्ये आज भाजपा कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राज्य सरकारचा निषेध करत बिपीन बिहारी गांगुली मार्गावरून लाल बाजारच्या दिशेने निघालेल्या व आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या शिवाय पाण्याचे फवारे देखील सोडले. यामुळे येथील परिस्थिती अधिकच चिघळताना दिसत आहे. आंदोलकांकडून हातात भाजपाचा झेंडा घेऊन ‘जय श्रीराम’ ही घोषणा देत राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
भाजपा कार्यकर्त्याच्या मृत्यू विरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाल बाजार परिसरातील पोलीस मुख्यालायास घेराव दिला होता. आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये महिलांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर आहे. जवळपास एक लाख कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस मुख्यलयाबाहेर भाजपाचा झेंडा फडकवत असणा-या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भाजपाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आलेली आहे.
मोर्चा काढला जात असलेल्या संपूर्ण मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोलकात्ता शिवाय हावडा व सियालदह येथे देखील भाजपाच्यावतीने राज्य सरकार विरोधात निदर्शने केली जात आहेत. या अगोदर मंगळवारी हावडा येथे भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

Conclusion: